विज ग्रंहाक महिलेला न्याय मिळवून देण्या साठी प्रहार चा आंदोलनाचा इशारा

विज ग्रांहक महिला न्याय मिळवुन 
देण्या साठी 
 महावितरण कार्यालयात प्रहार चा आंदोलनाचा इशारा 

देवळाली प्रवरा येथील घरकुल योजना निवासात रहिवाशी एकल महिला ४० हजार रुपये वीज बिल आकारले. आणि बिल भरले नाही म्हणून तब्बल तीन वर्ष  कुटुंबाला अंधारात  जगणे वाट्याला आल्याने या एकल महिलेला न्याय मिळण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने  23 जून या जागतिक विधवा दिनाच्या दिवशी देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस यांनी दिली. 
      देवळाली प्रवरा हद्दीतील खटकळी येथील नगरपालिकेच्या घरकुलामध्ये रहिवासी असलेल्या विधवा भगिनी तमिजा शेख वय ६५ यांना महावितरण कंपनीने जवळपास ४० हजार रुपयांचे वीज बिल आकारून त्यांची वीज सेवा तीन वर्षांपासून खंडित केली आहे. याबद्दल संबंधितानी  वारंवार महावितरणच्या देवळाली प्रवरा येथील कार्यालयात वीज मीटर मधील दोष दुरुस्ती करून ऍव्हरेज बिलाप्रमाणे बिल आकारून सदर वीज जोडणी करणे कामी विनंती केली आहे. तथापि महावितरण कंपनीने वीज जोडणी केली नसल्याने सदर कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. व एका मुलाला तर शाळा सोडून द्यावी लागली आहे.  परिणाम महावितरणच्या गलथान कारभारामुळे या कुटुंबातील मुलांचे भविष्य अंधकारमय झाले आहे. या घटनेची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की..,
     सुरुवातीला कमीजा शेख यांचे विज बिल केवळ ७० रुपये आले आहे. त्या दिनांक पासून आज अखेर या ग्राहकाचे जरी अव्हरेज बिल काढले तरी ते चाळीस हजार रुपये होत नाही. तसेच त्याच घरकुलामध्ये शेजारी राहणाऱ्या कुटुंबाला प्रतिमाह २९० रूपये वीज बिल येते. त्यामुळे नगरपालिकेच्या एकाच घरकुलात समान खोल्या असलेल्या शेजारी शेजारी राहणाऱ्या दोन वीज ग्राहकांच्या बिलामध्ये एकाला २९० रुपये तर दुसऱ्याला चाळीस हजार रुपये वीज बिल आकारणी करणे योग्य नाही. घरकुलामध्ये राहणारे रहिवासी मजुरी करून कुटुंबाची गुजरात करतात. ते इतके विज बिल भरू शकत नाहीत. म्हणून न्याय मागण्यासाठी सदर कुटुंबाने मध्यंतरीच्या काळात प्रहार जनशक्ती पक्षाकडे धाव घेतली होती. प्रहारचे वतीने ही बाब देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयाचे निदर्शनास आणून दिली व सदर कुटुंबाचे घरात कौटुंबिक कार्यक्रम असल्याने त्यांना तात्पुरती वीज देण्याची विनंती केली होती. त्यावेळी देवळाली प्रवरा कार्यालयातील अधिकार्‍यांनी या कुटुंबाला कार्यक्रमापुरती शेजारून एका रात्रीसाठी वीज जोडणी घेण्यास तोंडी सांगितले व त्याच रात्री शेजाऱ्याचे घरावर तपासणी पथक पाठवून त्या शेजाऱ्याने वीज दिल्याबद्दल शेजाऱ्याला जवळपास आठ हजार रुपये दंड ठोठावला. व दंड भरेपर्यंत शेजाऱ्यांचीही वीज तोडली. अशा पद्धतीने महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची वसुलीसाठी दादागिरी सुरू असल्याने सदर विधवा बहिणीचे कुटुंब हतबल होऊन तब्बल तीन वर्ष अंधार कोठडीचे जिने या कुटुंबाच्या वाट्याला आले आहे.
     त्यामुळे महावितरण कंपनीकडून देवळाली प्रवरा येथील विधवा भगिनी तमीजा शेख यांचेवर होणारा अन्याय थांबवावा व या घटनेची कसून चौकशी होऊन या कुटुंबाला तीन वर्षे अंधारात राहावे लागल्याने न्याय मिळण्यासाठी यांचे विज बिलाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करावी व चुकीचे आकारण्यात आलेले विज बिल दुरुस्त करून देऊन त्यांच्याकडून ३०१९ मधील ७० रुपये बिलाप्रमाणे किंवा जास्तीत जास्त शेजारील ग्राहकाचे प्रमाणे २९० इतके ऍव्हरेज बिल आकारणी करून भरणा करून घ्यावा व त्यांची वीज पूर्ववत जोडून देण्यात यावी व त्यांचेवर महावितरण कंपनीकडून होत असलेला अन्याय थांबवावा.  अन्यथा जागतिक विधवा दिन दिनांक २३ जून २०२३ रोजी सकाळी ११.०० पासून देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात एकल महिले सह  प्रहार जनशक्ती पक्ष  कार्यकर्ते बेमुदत किया आंदोलन करणार असल्याचे निवेदनात ढूस यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार