आदीवासी बाधवांना कृषी औजारे

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि किटकशास्त्र विभागाच्या अखिल भारतीय सूत्रकृमी संशोधन योजनेमार्फत आदिवासी उपयोजनेतून पळसून, ता. नवापूर, जि. नंदुबार येथे सायकल कोळपे, ट्रायकोडर्मा प्लस-जैविक किडनाशक व कृषिदर्शनी या कृषि निविष्ठांचे मोफत वाटप आदिवासी शेतकरी बाधवांना करण्यात आले. सदर कार्यक्रम भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी अदिवासी उपयोजनेसाठी मंजुर केलेल्या विशेष निधीतून विस्तार शिक्षण संचालक व किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या प्रसंगी शेतकर्यांना विविध पिकांवर होणार्या सुत्रकृमींच्या प्रभावी नियंत्रणाबाबतचे मार्गदर्शन किटकशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित सुत्रकृमी संशोधन योजनेतील सहाय्यक सूत्रकृमी शास्त्रज्ञ डॉ. पल्लवी पाळंदे यांनी केले. या कार्यक्रमाला संशोधन सहयोगी  विनोद पवार,  हरिचंद्र भुसारी, पळसून गावचे सरपंच, उपसरपंच व आदिवासी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सरपंच श्री. संतोष कोकणी यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अ.भा.स. सुत्रकृमी संशोधन योजना व  भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार