प्रसाद नगर येथील नागरिकांना शासनाने मोफत घरे द्यावी

प्रहार ची मागणी प्रसाद नगर येथील गरजुना शासन मार्फत मोफत घरे द्या 

प्रसादनगरच्या बंद दगडखान जागेची शासनाकडून पाहणी.
 प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख आप्पासाहेब ढूस यांचे मागणीरून देवळाली प्रवरा हद्दीत प्रसादनगर भागात असलेल्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवून तेथील बेघर कुटुंबांना मोफत घरे उपलब्ध करून देवू असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नामदार बच्चुभाऊ कडू यांनी नागपूर येथे नुकतेच केले होते. 
त्यानुसार प्रहार चे जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांचे  सहकार्याने शासन पातळीवर सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे नगरच्या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांचे आदेशाने राहुरी येथील मंडलाधिकारी यांनी अलिकडेच प्रसादनगर येथील बंद दगडखान जागेची पाहणी केली. 
     नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र विधान मंडळाच्या दिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कच्च्या मातीच्या पाल घरामधील भटक्या विमुक्त जाती जमती नागरिकांना घरे मिळावीत म्हणून आ. बच्चुभाऊ कडू यांनी उभारलेल्या आंदोलन प्रसंगी अहमदनगर जिल्ह्याचे प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजीत पोटे व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अप्पासाहेब  ढूस यांनी आ. बच्चुभाऊ कडू यांची भेट घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा शहरात असलेल्या राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील झोपडपट्टी भागात असलेल्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवून येथील बेघर भटक्या विमुक्त जाती आणि जमाती च्या नागरिकांना मोफत घरे उपलब्ध करून देणे बाबत  मागणी करण्यात आली होती 
       त्यानुसार सूरू असलेल्या पाठपुराव्यामुळे व अहमदनगरचे जिल्हाधिकारी  यांचे आदेशाने राहुरीच्या मंडलाधिकारी यांनी प्रसादनगर मधील बंद दगडखान जागेची पाहणी केली. प्रसंगी प्रहार श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे अध्यक्ष आप्पासाहेब ढूस व नागरीक उपस्थित होते. 
     
     

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार