पिकांवरील किड नियंत्रण

नारायणगाव येथे पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प  विषयावरील प्रशिक्षण संपन्न

महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, कृषि विज्ञान केंद्र, नारायणगाव, जि. पुणे व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिकांवरील किड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प 2023-24 (खरीप हंगाम) या विषयावरील एक दिवसाचे प्रशिक्षण कृषि विज्ञान केंद्र, नारायणगांव येथे आयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव व शिरुर या तालुक्यातील तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व कृषि सेवक या अधिकार्यांना खरीप हंगामातील पिकांवरील किडी व रोगांबाबत माहिती देण्यासाठी राजगुरुनगरचे उपविभागीय कृषि अधिकारी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 
या कार्यक्रमात महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील किटकशास्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सखाराम आघाव यांनी सोयाबीनवरील महत्वाच्या किडी व त्यांचे नियंत्रण व मक्यावरील अमेरिकेन लष्करी अळीचे नियंत्रण याबाबत मार्गदर्शन केले. कडधान्य सुधार प्रकल्पाचे तुर किटकशास्रज्ञ डॉ चांगदेव वायळ यांनी तुरीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत सखोल व सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. चांगदेव वायळ यांनी कडधान्यांची शेती ही पुस्तिका तुरीची सुधारीत पद्धतीने लागवड ही घडीपत्रिका व महात्मा फुले कृषि विद्यापीठाची सन 2023 ची कृषिदर्शनीचे वितरण केले. या कार्यक्रमाला राजगुरुनगरचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. सतिश शिरसाठ, नारायणगाव कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे व जुन्नर तालुका कृषि अधिकारी योगेश यादव, खेड तालुका कृषि अधिकारी भोसले, आंबेगांव तालुका कृषि अधिकारी वाणी, शिरुर तालुका कृषि अधिकारी वेताळ,  डवळे आणि चारही तालुक्यातील मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक व कृषि सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार