एम पी के व्हीत 28 व्या कडधान्य बैठकीचे आयोजन

महात्मा फुले कृषि विद्यापीठात 28 व्या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचे आयोजन
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्प आणि भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपूर (भा.कृ.अ.प.) यांचे संयुक्त विद्यमाने 28 वी वार्षिक रब्बी कडधान्य बैठक दि. 1 ते 3 सप्टेंबर, 2023 या कालावधीत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजीत करण्यात आली आहे. या वार्षिक रब्बी कडधान्य बैठकीचे उद्घाटन 1 सप्टेंबर, 2023 रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे उपमहासंचालक (पिके) डॉ. टी.आर. शर्मा हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील असणार आहे. याप्रसंगी नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक (कडधान्य व तेलबिया) डॉ. संजीव गुप्ता, कानपूर येथील भारतीय कडधान्य संशोधन संस्थेचे संचालक डॉ. जी.पी. दिक्षीत, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार आणि कानपूर येथील अखिल भारतीय रब्बी कडधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प समन्वयक डॉ. शैलेश त्रिपाठी तसेच इक्रिसॅट व इकाड्रा आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ हे उपस्थित राहणार आहेत. 
सदर बैठकीस रब्बी कडधान्य पिकांवर संशोधन करणारे देशभरातील विविध राज्यातून  शास्त्रज्ञ उपस्थित राहणार आहेत. बैठकीदरम्यान विविध तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले असून यात मागील वर्षी हरभरा, मसूर, वाटाणा आणि लाखोळी या रब्बी कडधान्य पिकांवरील झालेल्या संशोधनाचा आढावा घेण्यात येऊन पुढील संशोधनाची दिशा ठरविण्यात येणार आहे तसेच या रब्बी कडधान्य पिकांचे नविन वाण शिफारशीत करण्यात येतील अशी माहिती वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजू अमोलिक आणि प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी दिली आहे

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार