अखिल भारतीय गरिबी निर्मूलन जिल्हाध्यक्ष-पत्रकार अक्षय करपे

अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या जिल्हाध्यक्ष पत्रकार अक्षय करपे यांची निवड

अखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीच्या अहमदनगर जिल्हा अध्यक्षपदी लेखक पत्रकार अक्षय करपे यांची संस्थापक अध्यक्ष लालासाहेब गायकवाड यांच्या आदेशाने निवड झाली आहे. सविस्तर वृत्त असे की आज समाजातील वंचित गरीब शोषित वर्ग जो वर्षानुवर्ष गरीबी मध्ये घोरपळून निघत आहे त्याला बाहेर कसे काढता येईल याकडे आज कोणाचेही लक्ष नाही. गरीब गरीब श्रीमंत श्रीमंत होताना दिसत आहे देशातील गरीबी दिवसान दिवस वाढत जाताना दिसत असूनही आज श्रीमंत अधिकाधिक श्रीमंत होत जात आहे. देशामध्ये समाजातील प्रत्येक गरिबाला हक्काचे घर शिक्षण मुलाबाळांसाठी सर्व सुविधा उपलब्ध कशा करून देता येईल याकडे आज प्रत्येकाने लक्ष दिले पाहिजे. यावेळी अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष तथा लेखक पत्रकार अक्षय करपे यांनी निवड झाल्यानंतर बोलताना म्हटले आहे की अखिल भारतीय गरीबी निर्मूलन समितीचा उद्देश कोणत्याही राजकीय प्रकारचा नसून समाजातील गरिबी कशी दूर करता येईल हाच या समितीचा उद्देश असून या माध्यमातून गरिबांच्या हक्काचा पैसा त्यांना मिळणाऱ्या सुविधा अधिकाधिक माझ्या पदाच्या मार्फत त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा मी प्रयत्न करणार असल्याचे आखिल भारतीय गरिबी निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष लेखक पत्रकार अक्षय करपे यांनी म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार