पेडगाव तलाठी दिड लाखाची लाच

महसुल ची खाबुगिरी 
तलाठी भाऊसाहेब हवे दोन लाख रुपये तडजोडी त दिड लाख  गुन्हा दाखल 
आकाश नारायण काशीकेदार, तलाठी सजा पेडगाव, ता. श्रीगोदे असे तलाठी भाऊसाहेब नाव आहे 
लाचेची मागणी- 2,00,000/-₹  तडजोडी अंती 1,50,000/-₹
लाचेची मागणी दिनांक- ता.11/07/2023
लाचेचे कारण - तक्रारदार यांनी त्यांच्या मित्राकडून तोंडी भाडेतत्त्वावर पोकलेन मशिन कामा करीता घेतला होता. सदरचा पोकलेन दि.11/7/2023 रोजी रात्री 01.00 वा. पेडगाव येथील तक्रारदार यांच्या परिचयाचे इसम यांच्या शेतात लावलेला असताना पेडगावचे तलाठी श्री काशी केदार व सर्कल डहाळे हे सदर पोकलेन लावले ठिकाणी आले व तक्रारदार यांना तुम्ही सदरचा पोकलेन वाळू उपसा करणेकरिता वापरत असल्याचे सांगून तक्रारदार यांना तुमच्या पोकलेन वर केस व दंडात्मक कारवाई न करण्यासाठी 3,00,000/-रु. आम्हाला द्यावे लागतील असे म्हणाले व दिनांक 11/7/2023 रोजी सकाळी तहसील कार्यालय श्रीगोंदा येथे तक्रारदार यांना भेटण्यास बोलवले. त्यानंतर तक्रारदार यांनी लाचलूचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथे त्यांची लाच मागणीची वरील प्रमाणे तक्रार नोंदवली. त्यानुसार दिनांक 11/07/2023 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी करण्यात आली, पडताळणी कारवाई दरम्यान यातील आलोसे काशीकेदार,तलाठी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडे 2,00,000/- रू. लाचेची मागणी करून तडजोडीअंती 1,50,000/-₹ लाच मागणी करून ती लाच रक्कम टप्प्या टप्प्याने स्वीकारण्याची तयारी दर्शविली म्हणून आज दिनांक 31/08/2023 रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे  गुन्हा दाखल करण्यात आला आहे
हैश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी
राजू आल्हाट, पोलीस निरीक्षक, ला.प्र. वि. अहमदनगर मो नंबर-: 9420896263
 पर्यवेक्षण अधिकारी प्रवीण लोखंडे, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि, अहमदनगर मो. नंबर :- 8007679900,

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार