आम जनतेला शासकी योजनाचा फायदा मिळवून द्या-माजी मंत्री शिवाजी कर्डीले

आम जनतेला विविध शासनाच्या योजनांचा फायदा मिळावा यासाठीच 
मंत्री काम करावे -माजी शिवाजी कर्डिले

गुहा येथील अनाथ छात्रालयातील ३१ विद्यार्थ्यांसह १५१ लाभार्थ्यांना मिळाला लाभ; संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वितरण

- संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना लाभ मिळावा यासाठी समिती सदस्यांनी काम करावे. शासनाच्या योजना जनतेपर्यंत गेल्या तर नक्कीच समाधान मिळते असे प्रतिपादन माजी मंत्री व जिल्हा सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी केले.
  गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालय येथे संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून सुमारे ३१ अनाथ विद्यार्थ्यांना व इतर लाभार्थ्यांना मंजुरी पत्र माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी ते बोलत होते. संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ, तहसीलदार चंद्रजीत राजपुत, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, के.मा.कोळसे, बबन कोळसे,  भैय्या शेळके, समितीचे सदस्य सरपंच सर्जेराव घाडगे, नारायण धनवट, अजित डावखर, अविनाश बाचकर, दिपक वाबळे, गोरख अडसुरे, संदीप आढाव, किरण ससाणे, नायब तहसिलदार सचिन औटी, आदी उपस्थित होते.
  शिवाजी कर्डिले म्हणाले की, संजय गांधी निराधार योजना समितीने अनाथ विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी चांगला उपक्रम राबविला असून यापुढेही अशा प्रकारे सर्वसामान्य लोकांना योजनेच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. शासनाच्या विविध योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्यास नक्कीच समाधान मिळते. प्रास्तविक करताना अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, खा.डॉ. सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी निराधार अनुदान योजना समिती काम करणार असून सामान्य नागरिक तहसिल कार्यालया पर्यंत पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी समिती सदस्य  पुढाकार घेऊन काम करतील असे सांगितले. यावेळी गंगाधर बाबा अनाथ छात्रालयातील ३१ विद्यार्थ्यांना व इतर लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजने अंतर्गत प्रकरण मंजूर झाल्याचे पत्र वितरित करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे देखील वितरण करण्यात आले.
        यावेळी किरण कोळसे, राजेंद्र कोळसे, मच्छिंद्र कोळसे, रमेश ठोंबरे, प्रसाद कोळसे, व्यवस्थापक पप्पू सपकाळ, सुजय काळे, सहायक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून संजय वाघ, नंदा मकासरे, आय टी असिस्टंट मंगेश साठे, तलाठी जालिंदर पाखरे, अभिजित क्षीरसागर, अंकुश सोनार, नितीन अहिरे, मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव, महेश देशमुख आदींसह लाभार्थी व विद्यार्थी उपस्थित होते. मंडलाधिकारी बाळकृष्ण जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर तहसीलदार चंद्रजीत राजपुत यांनी आभार मानले.

  # संजय गांधी निराधार योजना समितीची निवडीनंतर पहिली बैठक गंगाधर बाबा छात्रालय येथे आयोजित करण्यात आली असून यामध्ये अनाथ ३१ विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात आला असून इतर लाभार्थ्यांसह १५१ जणांना लाभ मिळाला आहे. संजय गांधी निराधार समितीच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे तसेच लाभार्थ्यांनी समिती सदस्यांशी संपर्क साधावा असे आवाहन अध्यक्ष पत्रकार विनित धसाळ यांनी यावेळी केले.#

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार