नागरिकांनी जिल्हा विकासा साठी सुचना पाठविण्यास मुदतवाढ-जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा 10 ऑक्टोबरपर्यंत सुचना पाठविण्यास मुदतवाढ  - जिल्हाधिकारी  सिद्धाराम सालीमठ

 जिल्हा प्रशासन पुढील २५ वर्षासाठी जिल्हा विकास धोरणात्मक आराखडा तयार करण्याच्या आहे. हा आराखडा जिल्हयाच्या सर्वागिण आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीने ध्येय, उदिष्टे, धोरणे आणि कृतीची इ. चा समावेश असेल.हा जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागरिकांनी सहभाग नोंदवावा. यापूर्वी नागरिकांच्या सुचना 20 सप्टेंबरपर्यंत मागविण्यात आल्या होत्या. परंतु सर्व क्षेत्रातील पुरेसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे सुचना पाठविण्यास  10 ऑक्टोबर, 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांनी लिखीत स्वरुपात सुचना  पाठविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, यांनी केले आहे.                                                                                                        
यामध्ये प्रामुख्याने कृषी, पायाभूत सुविधा, सिंचन, उद्योग, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण बदल, पर्यटन, संस्कृती, जिल्ह्याचा विकास, रोजगार, शिक्षण, एमआडीसी विकास, राहणीमानाचा दर्जा, डिजीटल कनेक्टिव्हीटी, विमानतळ, रेल्वे आणि रस्त्याची उपलब्धता अशा विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे. तसेच बदलत्या सामाजिक, आर्थिक आणि हवामान परिस्थितीच्या संदर्भात आपल्या जिल्हयातील संधी व जिल्हया समोरील आव्हाने या विषयावर आले मत महत्वाचे आहे.

         धोरणात्मक आराखडयाचे यश सक्रिय लोकसहभाग आणि अभिप्रायावर अवलंबून आहे तसेच सर्व भागधारकांच्या विशेषत: अहमदनगर जिल्हयाच्या नागरिकांच्या समस्या, आकांक्षा आणि गरजावर अवलंबून आहे म्हणून जिल्हा विकासाच्या धोरणात्मक आराखडयासाठी तुमचे मौल्यवान मते आणि सूचना सामायिक करण्यासाठी आमंत्रित करत आहेत. नागरिकांनी त्यांच्या सुचना 10 ऑक्टोबर, 2023 पर्यंत dsp.ahmednagar@gmail.com या ईमेल द्वारे लिखीत स्वरूपात पाठविण्यात याव्यात असेही आवाहन  जिल्हाधिकारी, सिध्दाराम सालीमठ यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार