महत्मा फुले कृषी विद्यापीठाने केला सुरु केला कम्युनिटी एफ रेडिओ

नगर जिल्ह्य़ात आणखी एक खासगी कम्युनिटी एफ रेडिओ 
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या एफ एम रेडीओ आवाज आता शेतकर्यांना पर्यंत पोहोचेल तंत्रज्ञान 
 फुले कृषि वाहिनीचे कुलगुरू डॉ  पी जी पाटील यांनी केले उद्घाटन  
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कम्युनिटी रेडिओ सेंटरची फुले कृषि वाहिनी 90.8 एफ.एम. चे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के, नियंत्रक सदाशिव पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोके, विभाग प्रमुख डॉ. महानंद माने, डॉ. आनंद सोळंके, डॉ. आण्णासाहेब नवले, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. कांबळे, प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे व रेडिओ सेंटरचे प्रमुख अधिकारी डॉ. आनंद चवई उपस्थित होते. 
याप्रसंगी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की तंत्रज्ञान प्रसारासाठी रेडिओ हे फार प्रभावी माध्यम असून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्याची मोठी मदत होणार आहे. शेतकर्यांप्रती विद्यापीठाची असलेली सामाजीक बांधिलकीची विन या रेडिओ सेंटरच्या माध्यमातून अधिक घट्ट होणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना विस्तार विभाग प्रमुख तथा कुलसचिव डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की विद्यापीठाचे स्वतःचे रेडिओ सेंटर असणे ही महत्वाची गोष्ट असुन त्यामुळे विद्यापीठाचे संशोधन शेतकर्यांपर्यत पोहचण्यासाठी मदत होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार