राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांची महात्मा फुले विद्यापीठास भेट

राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सदिच्छा भेट

राज्याचे कृषि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी मध्यवर्ती परिसरातील विविध संशोधन प्रकल्पांना भेटी देऊन संशोधनाविषयीची माहिती संबंधित शास्त्रज्ञांकडून जाणून घेतली. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, कुलसचिव  विठ्ठल शिर्के, पुणे कृषि विभागाचे सहसंचालक  रफिक नाईकवडी, सहयोगी संशोधन संचालक डॉ. राजेंद्र वाघ, अहमदनगरचे आत्मा प्रकल्प संचालक  विलास नलगे, प्रसारण अधिकारी डॉ. पंडित खर्डे, आत्मा उपसंचालक राजाराम गायकवाड, राहुरी तालुका कृषि अधिकारी  बापुसाहेब शिंदे, मंडल कृषि अधिकारी अशोक गिरगुणे उपस्थित होते. कृषि आयुक्तांनी यावेळी सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र तसेच नैसर्गिक शेती संशोधन प्रकल्प, बांबू संशोधन प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित भाजीपाला सुधार प्रकल्प, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळे संशोधन प्रकल्प तसेच बियाणे विभागांना भेटी दिल्या. यावेळी डॉ. आनंद सोळंके, डॉ. भगवान ढाकरे, डॉ. उल्हास सुर्वे, डॉ. जितेंद्र ढेमरे,डॉ. बाबासाहेब सिनारे, डॉ. धनश्री पाटील, डॉ. कल्पना दहातोंडे व डॉ. कैलास गागरे या शास्त्रज्ञांनी प्रकल्पांबाबतची माहिती दिली. 
यावेळी भाजीपाला सुधार प्रकल्पाच्या प्रक्षेत्रावर ड्रोन फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी ड्रोनद्वारे औषध फवारणी संबंधीची माहिती डॉ. सी.एस. पाटील व कृषि शक्ती व यंत्रे विभागचे विभाग प्रमुख डॉ. सचिन नलावडे यांनी दिली. कृषि आयुक्तांनी यावेळी विद्यापीठामध्ये होत असलेल्या संशोधनाबाबत समाधान व्यक्त केले. या भेटी प्रसंगी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, कृषि विभागाचे अधिकारी, संबंधीत प्रकल्पाचे कर्मचारी उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार