भोजनात भरडधान्य वापर करा आहारतज्ञ ऋतुजा दिवेकर

शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी भरडधान्य उपयुक्त
-  आहारतज्ञ श्रीमती ॠजुता दिवेकर

आपल्या दैनंदिन आहारात भरडधान्याचा वापर कसा करता येईल हे आपण पाहिले पाहिजे. आठवड्यातुन कमीत कमी तीनवेळा आपल्या आहारात भरडधान्याचा समावेश भाकरीच्या रुपाने करावा. आपण आहारामध्ये काय खावे हे एक तर अन्न पिकविणार्या शेतकर्याने आणि आपली आई किंवा आजी यांनी सांगितले पाहिजे तरच आपण परिपूर्ण आहार घेत आहोत असे समजावे. यामुळे आपण खुप सार्या आजारांपासून दुर राहु शकतो. भरडधान्याच्या आहारात केलेल्या योग्य वापरामुळे आपले शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी उपयुक्त ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या मिशन मिलेटच्या सल्लागार तसेच  आहारतज्ञ  ॠजुता दिवेकर यांनी केले. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त शाश्वत श्रीअन्न शेती या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन विद्यापीठातील डॉ. नानासाहेब पवार सभागृहात करण्यात आले आहे.याप्रसंगी झालेल्या दैनंदिन आहारात श्रीधान्याचे महत्व या विषयावरील विशेष सत्रात मार्गदर्शन करतांना श्रीमती ॠजुता दिवेकर बोलत होत्या. यावेळी राज्याचे कृषि विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. अनूप कुमार, महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. 
      श्रीमती दिवेकर आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या की पुरुष जोपर्यंत स्वयंपाक घरात येत नाहीत तोपर्यंत श्रीधान्य निरंतर राहणार नाही. ही जबाबदारी आपणा सर्वांची आहे. पौष्टिक तृणधान्ये ही पर्यावरण पूरक, जमिनीच्या आरोग्यासाठी योग्य तसेच दुष्काळातही तग धरू शकणारी व कमी मनुष्यबळात येणारी पिके आहेत. पौष्टिक तृणधान्ये ही अशक्तपणा, नैराश्य, चिंता यावर चांगला उपाय असून त्यांचा दैनंदिन आहारात प्राधान्याने वापर करायला हवा. पौष्टिक तृणधान्यांचा आहारातील वापर करताना तीन नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यामध्ये पदार्थातील पौष्टिक तृणधान्यांचे संयोजन, त्याचे प्रमाण आणि कोणत्या ऋतूत ग्रहण करायचा, यासंबंधी माहिती त्यांनी  दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. याप्रसंगी झालेल्या पहिल्या तांत्रिक चर्चासत्रात ज्वारी व बाजरी या पिकांवरील तांत्रिक माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथील ज्वारी पैदासकार डॉ. आर. बी. घोराडे, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या बाजरी संशोधन केंद्राचे बाजरी पैदासकार डॉ. कुशल बराटे,इंदापूर, जि. पुणे येथील समृद्धी कृषि उद्योगाचे डॉ. तात्यासाहेब फडतरे यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. दुसर्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये नाचणी व बरी या पिकांवरील तंत्रज्ञान विषयक माहिती भरडधान्य पैदासकार डॉ. योगेश बन, नाशिक येथील कळसुबाई मिलेट्सच्या श्रीमती नीलिमा जोरवार तसेच पिसात्री, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथील मिलिंद पाटील यांनी मार्गदर्शन केले. तिसर्या तांत्रिक चर्चासत्रात वरई व कोडो या पिकांवर तांत्रिक मार्गदर्शनामध्ये शेतकरी म्हणून अकोले तालुक्यातील खडकी येथील श्री. अजित भांगरे यांनी मार्गदर्शन केले. चौथ्या तांत्रिक चर्चासत्रात राळा व बर्टी या पिकांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये अनंतपुर, आंध्रप्रदेश येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.चंद्रमोहन रेड्डी, नंदयाल, तेलंगणा येथील सत्व मिलेट्स अनुपुरूचे  के. व्ही. रामा सुब्बा रेड्डी यांनी तर शेतकरी म्हणून अमरावती जिल्ह्यातील धारणी तालुक्यातील बिजूधावडीचे तप्तीपुत्र शेतकरी उत्पादक कंपनीचे  सुखराम धुर्वे यांनी मार्गदर्शन केले. पाचव्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये विपणन, प्रसिद्धी व मूल्य साखळी याविषयी संस्था व विपणन, पुणे येथील स्वतंत्र सल्लागार शिरीष जोशी, आय. आय. एम. आर. हैदराबाद येथील न्यूट्रीहबचे डॉ. दयाकर राव,  स्वामी समर्थ शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक  नरेंद्र पवार, कृषि आयुक्तालय पुणेचे संचालक (आत्मा) डॉ. दशरथ तांभाळे यांनी मार्गदर्शन केले. सहाव्या तांत्रिक चर्चासत्रामध्ये धोरणात्मक बाबी व भविष्यातील दिशा या विषयावर बायफ, पालघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  संजय पाटील, पुणे कृषि आयुक्तालयाचे सहसंचालक  सुनील बोरकर, नाशिक येथील प्रगती अभियानच्या श्रीमती अश्विनी कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, अधिष्ठाता (कृषि) डॉ. श्रीमंत रणपिसे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. सी.एस. पाटील, राज्याचे विस्तार व प्रशिक्षण कृषि संचालक  दिलीप झेंडे, आत्माचे संचालक डॉ. दशरथ तांभाळे, सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, कृषि आयुक्तालय, पुणे येथील सहसंचालक  रफिक नाईकवाडी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  सुधाकर बोराळे, सर्व विभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, राज्यभरातून आलेले निमंत्रित शेतकरी तसेच महिला शेतकरी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार