निभेरे येथे ग्राम मेळावा

निंभेरे येथे शासकीय योजना अभिसरण मेळावा संपन्न 
कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था अंतर्गत गावामध्ये जलकल जीवन कार्यक्रम सुरू आहेत जलकल जीवन कार्यक्रमांतर्गत निंभेरे गावात वृक्ष लागवड,  बायोगॅस उभारणी,शेत तलाव,शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुकूटपालन, तसेच एकूण 250 घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग ,lbs,gabian पाणलोट उपचार,सिमेंट बंधारा दूरुस्ती,फळबाग लागवड,मत्स्य व्यवसाय,शेतीशाळा,शेतकरी अभ्यास सहली,बचत गट प्रशिक्षण,भिंतीचीत्रे,शासकीय इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग,अनेक छोटे मोठे लोककल्याणकारी उपक्रम चे काम झालेले आहेत व अजून पुढील टप्प्यात इतर घरांना  हार्वेस्टिंग करणार आहेत तसेच गांडूळ,बायोडेनामिक खत प्रात्यक्षिक,ऑरगॅनिक शेती,डेमो प्लॉट इत्यादी वैयक्तिक लाभ तसेच माती आणि पाणी संवर्धनासाठी गॅबियन,LBS , शिवडी तलाव नाला खोलीकरण,नागरे वस्ती नाला खोलीकरण इत्यादी कामे झालेली आहेत. गावामध्ये सोलर दिवे मराठी शाळेला रंगकाम इत्यादी सार्वजनिक कामे पूर्ण करण्यात आलेले आहेत तसेच बुधवारी  27 डिसेंबर 2023 रोजी जलकल जीवन कार्यक्रम आणि ग्रामपंचायत निंभेरे यांच्या संयुक्त विद्यमाने निंभेरे गावामध्ये शासकीय योजनांचा अभिसरण कार्यक्रम आयोजित केला होता सदर कार्यक्रमांमध्ये राहुरी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्री प्रवीण सिनारे साहेब तसेच तालुका कृषी अधिकारी बापू शिंदे साहेब  आरोग्य अधिकारी जीवधने ,विस्तार अधिकारी अनारसे ,वन अधिकारी  मुसाभाई पठाण , पंचायत समितीचे तनपुरे साहेब,उमेद अभियान व्यवस्थापक प्रवीण गायकवाड , निंभेरे ग्रामपंचायत  येथील ग्रामसेवक  सचिन कोल्हापूर तसेच महसूल सर्कल अधिकारी  खर्माळे,कृषी विभाग पंचायत समिती राठोड साहेब, कृषी सहाय्यक निंभेरे माननीय इंगळे साहेब,तलाठी भाऊसाहेब, आणि पशुसंवर्धन अधिकारी  बंड साहेब,पंचायत समितीच्या इतर विभागाचे विभाग प्रमुख, ग्रामपंचायत लोकनियुक्त सरपंच शांताराम सिनारे, उपसरपंच जयश्रीताई सिनारे,  माजी सरपंच विष्णू  सिनारे,राजेंद्र सिनारे,चंद्रकांत विधाते,ग्रामपंचायत सदस्य सुभाष सिनारे,सतीश नाकाडे,योगेश आंधळे तसेच कृषी विकास संस्थेचे प्रकल्प समन्वयक  स्वामी कालेकर , अमित पवार,निंभेरे ग्रामपरिवर्तक वैभव भास्कर नाकाडे, सुरेखा विधाते, सत्यजित वाडेकर ,जलकल जीवन कार्यक्रम  अध्यक्ष प्रकाश सिनारे  आदी उपस्थित होते.

सर्व अधिकारी यांनी आपापल्या विभागाच्या लोक कल्याणकारी योजना उपस्थित ग्रामस्थांना समजून सांगितल्या व त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत वेबसाईट याची विस्तृत माहिती दिली.
तालुका कृषी अधिकारी यांनी mahadbt पोर्टल वर फॉर्म भरण्याचे सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले. गटविकास अधिकारी  प्रवीण सिनारे यांनी गावं विकासासाठी सर्व गावकरी यांनी एकत्र यायला हवे सर्व गावकरी यांनी एकत्र येऊन संपूर्ण गावाची शिवार फेरी करून जलसंधारण विषयक भरीव कामे घेता येऊ शकतील त्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे याचे महत्त्व विषद केले.
गावातील 250 पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कार्यक्रमास सहभाग नोंदवला. स्नेहभोजन घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जल कल जीवन कार्यक्रम आणि ग्रामपंचायत निभेरें यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्प समन्वयक स्वामी कालेकर  यांनी केले तर आभार प्रदर्शन जल कल जीवन कार्यक्रम अध्यक्ष प्रकाश सिनारे यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार