पिंपळने येथे एसटी बस पल्टी

पिपळने एसटी बस पल्टी 
मंगळवारी सकाळी एस टी महामंडळाची राहुरी कडून संगमनेर कडे येणारी बस संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये एक्सेल तुटल्यामुळे पलटी झाली आहे. सदर बसने मुख्यत्वे करून विद्यार्थी प्रवास करत होते.
   काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर पोलीस घटनास्थळी असून, स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी हजर आहेत. किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवलेले आहे.
   
 "जखमीना उपचारा साठी रुग्णालयात पाठविण्यात आले पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.
   -सोमनाथ वाघचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार