नगरचे माहीती अधिकारी आता डाॅ किरण मोघे

नगरचे जिल्हा माहिती अधिकारी आता डॉ. किरण मोघे 

नगर जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार डॉ.किरण मोघे यांनी आज स्वीकारला.

डॉ.किरण मोघे हे नगर आगोदर पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून २०२१ पासून कार्यरत होते. त्यांच्या जागेवर नगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ.रवींद्र ठाकूर यांची बदली झाली आहे.

अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू झाल्यावर त्यांचे शिर्डी उपमाहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संतोष गुजर, धनंजय जगताप, सुरज लचके, प्रविण मुठे, चिंतादेवी जयस्वार यांनी त्यांचे स्वागत केले. 

डॉ.मोघे यांनी यापूर्वी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती अधिकारी पदावर काम केले आहे.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार