जिल्हाच्या सिमेवर बंदोबस्त जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ

जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करण्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांचे आवाहन

जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यांमधील पोलीस, उत्पादन शुल्क आणि परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वयाने आणि प्रभावीपणे वाहनांची तपासणी करून अवैध मद्य, पैसे किंवा प्रलोभनासाठी उपयोगात येणाऱ्या भेटवस्तूंच्या वाहतूकीला प्रतिबंध करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर प्रशांत खैरे,  निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील आणि दूरदृष्य प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी अविनाश पाठक, डॉ.सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक संजय जाधव, अविनाश बारगळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.  

शेजारील जिल्ह्यातील यंत्रणांनी समन्वयाने काम केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसतील. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी अवैध मद्य आणि पैशाच्या वाहतुकीवर कठोरपणे प्रतिबंध करणे आवश्यक असल्याने आवश्यक त्या ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथके तैनात करण्यात येतील, त्यासाठी शेजारील जिल्ह्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सालीमठ यांनी केले. 

बीड जिल्ह्याला लागून असलेल्या भागात दोन जागी पोलीसांचे पथक तैनात असून  स्थिर सर्वेक्षण 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार