श्रीकृष्ण गोपाल संस्थेच्या वतीने वसुबारस

दिपावलीच्या आगोदर येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्या वद्य व्दादशीला या दिवशी साजरा केला जातोय याला गोवत्स व्दादशी म्हणून ओळखले जाते 
भारत हा कृषी प्रधान देश आहे. गाय म्हणजे गो माता ती दुध देते व शेतकर्याला समृध्द करीत समृध्दी करते तशेच शेण खतातुन भुमातेला समृध्द करते 
वसुबारसेला घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्मांच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. ह्या दिवसापासून घरासमोर रांगोळी काढण्यास सुरुवात करतात. काही स्त्रियांचा या दिवशी उपवास असतो.घरातील गाय वासरू यांना अंघोळ घातली जाते. अंगाला हळद लावली जाते, त्यांच्या अंगावर नवी वस्त्रे घातली जातात. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. स्त्रिया बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. भरपूर कृषी उत्पादन व्हावे, आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे व सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात, परिसरात दिवाळी सणाच्या प्रारंभानिमित्त होते 
सोमवारी 28 ऑक्टोबर 2024 सोमवारी 
 वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस आपल्या गोपाल कृष्ण गोशाळेत वासरासह गोमातेचा पूजन कार्यक्रम सायंकाळी पाच वाजता भारत सरकारच्या जल नायक पुरस्काराने गौरविलेले पत्रकार शिवाजी घाडगे व त्यांच्या सुविद्य पत्नी यांच्या शुभहस्ते व भडकत्या ज्वालाचे संपादक निसार सय्यद, जेष्ठ पत्रकार अनिल देशपांडे, कर्णा जाधव, सुभाष संसारे,श्रीकांत जाधव,ॠषी राऊत,जालिंदर अल्हाट 
आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे कार्यक्रमास उपस्थित राहावे हि नम्र विनंती 
ठिकाण
 गोपाल कृष्ण गोशाळा चिंचविहिरे ललित धनराज चोरडिया (गोपालक)
94 0498 0538

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार