राहुरी -नगर -पाथर्डी धानमतदार संघात तनपुरे व कर्डीले कुस्ती

राहुरी नगर पाथर्डी विधानसंभा निवडणूकीत तनपुरे व कर्डीले यांचीच कुस्ती 
चर्चेतील बातमी @पत्रकार शिवाजी घाडगे 
राहुरी -नगर- पाथर्डी
 विधान संभा मतदार संघात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपुरे व भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यात थेट लढत होईल अशी मतदार संघात चर्चा आहे
तशी एकास एक लढत नाही बाकी पक्षा सह अपक्ष देखील आपन लोकशाही बळकट व सक्षम करण्या साठी उभे आहोत यावर ठाम असून प्रचार करत आहेत तसा हा मोठा मतदार संघ आहे मागील पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री  शिवाजी कर्डीले सुरवातीला एक लाख मताधिक्य मिळवून विजयी होतील असे चित्र होते मात्र नेहमी स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढगारे कर्डीले दुसऱ्याच्या भरवशावर राहीले अण तेथेच घात झाला अण स्थानिक सुशिक्षित उमेदवार म्हणून प्राजक्त तनपुरे आमदार झाले खरतर प्राजक्त ही निवडुन लढवयाला तयार नव्हते कारण गेल्या काही निवडणुकीत तनपुरे यांना मतदार नाकारीत होते त्यामुळेच प्राजक्त नको म्हणत होते मात्र मामा जंयत पाटील व मेहुने सुशिल देशमुख यांनी प्रचार यंत्रणाना व्यवस्थित हाताळली तसे बाकी जिवाभावाचे कार्यकर्ते याच्या मदतीने 
 प्राजक्त तनपुरे आमदार झाले व राज्यमंत्रिपद देखील मिळाले नंतर अडीच वर्ष विरोधी बाकावर बसाव लागल मात्र शपथविधी भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राजक्त तनपुरे या॔चे कौतुक करत मी राज्यमंत्रि म्हणून त्यांच्या निर्णयात हस्तक्षेप केला नाही पूर्ण अधिकार दिले होते अस सागुन टाकल मग मात्र एडी कार्यालयात प्राजक्त यांना जाव लागल होत 
भाजपा महा युतीच सरकार आल्यावर व जिल्हा सहकारी बॅकेचे अध्यक्ष झाल्यानंतर शिवाजी कर्डीले यांनी नेहमी प्रमाणे कामाचा धडाका लावला तसे कर्डीले यांच्या कडे काम घेऊन गेलेल्या ते नाराज करत नाहीत तशी जिल्हा बॅकेची निवडणूक कर्डीले यांना रोखण्या साठीच झाली होती मात्र कर्डीले यांनी घडवून आनले कर्डीले यांचा आमदारकी मध्ये पराभव झाल्यानंतर त्यांनी भाजपा पराभुत उमेदवारांचे शिष्टमंडळ घेऊन वरिष्ठा कडे तक्रार केल्या होत्या त्यामुळेच आमदार राम शिंदे पारनेर करांना गाडीत घेऊन हिंडले अण जे पेराल तेच उगवत हे दाखवून दिले 
राहुरी मतदार संघात भाजपाचा जन्म कोणा मुळे झाला हे राहुरी कराना चांगलाच ठाऊक आहे प्रसाद तनपुरे खासदार झाले अण पोट निवडणुकीत दिवगंत नेते रामदास धुमाळ व भाजपाचे चंद्रशेखर कदम यांची लढत झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवळालीचे नाते संबंध टिकवले 
मतदान मोजनीत अंधार झाला अण भाजपाचे चंद्रशेखर कदम आमदार झाले नंतर पुन्हा प्रसाद तनपुरे 600 मताने आमदार झाले कदम यांच्या पराभवाचे खापर वांबोरी वर पत्र टाकुन फोडले गेले नंतर पुन्हा एकास एक लढत होऊन प्रसाद तनपुरे यांना पराभव झाला तो शेवटपर्यंत तेव्हा राहुरी मतदार संघ तुटला अण राष्ट्रवादी कडुन लोकसभा लढवलेले शिवाजी कर्डीले दिवगंत नेते गोपीनाथ मुढे याच्या मदतीने राहुरीचे आमदार झाले ते सलग दहा वर्ष नंतर मागच्या निवडणुकीत शिवसेनेने प्राजक्त तनपुरे यांना आतुन मदत केली अण ते आमदार झाले
शिवाजी कर्डीले हे देखील माजी राज्य मंत्री व पंचवीस वर्ष आमदार राहीले आहेत ते पहिवाल आहेत या निवडणुकीत काय डाव टाकणार 
तर प्राजक्त तनपुरे हे देखील राज्यमंत्री व अमिरेकेत पदवि घेतलेले उच्च शिक्षित आहेत 
आता पुन्हा तनपुरे व कर्डिले यांची घासून लढत आहे कारण कोणीच कशात कमी नाही तेव्हा 23 नोव्हेंबर रोजी राहुरी विधान संभा तुतारी वाचनार की कमळ फुलणार हे समजेल 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार