नगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले मतदान

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले मत 
 टपाली मतपत्रिकेद्वारे बजावला मतदानाचा हक्क

लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करण्याचे आवाहन
लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी  प्रत्येकाने येत्या २० नोव्हेंबर रोजी आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले.
 
तहसील कार्यालय अहिल्यानगर येथील टपाली मतदान सुविधा केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सालीमठ यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले.

ते म्हणाले,   लोकशाही अधिक बळकट व सक्षम करण्यासाठी प्रत्येकाच्या मताला  महत्व आहे. लोकशाहीच्या या  उत्सवामध्ये येत्या प्रत्येकाने सहभागी होत  आपल्या मतदानाचा हक्क बजावावा. मतदान करताना निवडणूक आयोगाने दिलेले ओळखपत्र सोबत बाळगावे. ओळखपत्र नसल्यास निवडणूक आयोगाने दिलेल्या १२ पर्यायापैकीचे ओळखपत्र सोबत बाळगून मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही  सालीमठ यांनी यावेळी केले. 

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार