राष्ट्र विकासात तरुणाई चे योगदान हवे तहसीलदार- नामदेव पाटील
राष्ट्र विकासा साठी तरुणाईचे योगदान हवे आत्मविश्वास ठेवा आनंदाई रहा शिक्षणा बरोबर चांगले व्यक्ती बना असे प्रतिपादन राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांनी देवळाली प्रवरा येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल येथे केले
येथील दिवंगत प्रभावती तुकाराम जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नमाला दत्तात्रय कडु यांनी त्याच्या भगिनी विद्यार्थांचा व्यक्ती मत्व विकसीत व्हावे या हतुने रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले
यावेळेस अध्यक्ष पदावरून नामदेव पाटील मार्गदर्शन करताना म्हणाले
विद्या धन हे सर्वात मोठे असुन आपली जिद्द व आत्मविश्वास आपल्याला यशाच्या उच शिखरांवर पोहचवतो कोणाला एखादया विषयात कमी गुण मिळाले असतील मात्र तो खेळात आपले ध्येय साध्य करु शकतो कष्ट केल्या शिवाय यश मिळत नाही सामुहीक कामातून यश लवकर मिळते. पंतगाला दोऱ्याचे बंधन असते म्हणून तो माघारी येतो मात्र त्या पंतगाचा काटा करण्या साठी अनेक जण टपलेले असतात
लहान वयात घरातील छोट्या मोठ्या कामात आपल्या आई वडीलाना कामात मदत करा वाईट मित्राची संगत करु नका व आपले आर्दश चांगले असुद्या
पाण्याचा माठ दगडाला झिजून आपली जागा निर्माण करतो तशी आपली जागा तयार करून यशस्वी व्हा
रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत आपली काम करण्याची प्रबळ इच्छा शक्ती असावी
Comments
Post a Comment