सुक्ष्म पाणी व्यवस्थापन गरजेचे डाॅ विठ्ठल शिंदे

सूक्ष्म सिंचन प्रणालीच्या वापराने सिंचन व्यवस्थापन करणे ही काळाची गरज
- संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के
राहुरी -
पाण्याच्या अतिवापरामुळे पिकांच्या मुळांचे नुकसान होऊन मुळांच्या शोषण क्षमतेवर परिणाम होतो. त्याचबरोबर जमिनीच्या भौतिक आणि जैविक गुणधर्मावर प्रतिकुल परिणाम होतात. परिणामी पिकांचे उत्पादन घटते. यासाठी सूक्ष्म सिंचन प्रणालीचा योग्य वापर करुन सिंचन व्यवस्थापन करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांनी केले. 
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे कार्यरत असलेले काटेकोर शेती विकास केंद्र व एन.सी.पी.ए.एच., भारत सरकार, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने सूक्ष्म सिंचन प्रणाली या विषयावरील सात दिवसीय कृषि अधिकारी प्रशिक्षण वर्गाचा उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. विठ्ठल शिर्के बोलत होते. यावेळी कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.डी. बनसोड, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. एस.बी. गाडगे, काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. एस.के. डिंगरे उपस्थित होते. 
डॉ. आर.डी. बनसोड यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले की सुरुवातीच्या काळात पाण्याच्या जास्त वापरामुळे जमिनी खराब झालेल्या आहेत. भरमसाठ पाणी देण्यापेक्षा पाहिजे तेवढे संतुलीत पाणी दिले तर पिकांची वाढ योग्य प्रकारे होते. सिंचन कार्यक्षमता ही योग्य सिंचन पध्दतींचा वापर करुन वाढविता येते. उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करण्यासाठी योग्य सिंचन पध्दतीचा वापर करायला हवा असे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाचे स्वागत डॉ. एस.के. डिंगरे यांनी तर प्रस्ताविक डॉ. एस.बी. गाडगे यांनी केले. यावेळी या प्रशिक्षणाचे प्रशिक्षणार्थी कोपरगावचे मंडल कृषि अधिकारी गणेश बिरदवडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्राच्या यंग प्रोफेशनल इंजि. भाग्यश्री मोरे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी प्रकल्पाचे सहसमन्वयक डॉ. अनिकेत चंदनशिवे तसेच राहुरी, कोपरगाव, पाथर्डी, नेवासा या तालुक्यातून   मंडल कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कृषि सहाय्यक  योगेश राजळे, यंग प्रोफेशनल इंजि. रंजन पांडे, भाग्यश्री मोरे, शांतनु कोहोकडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार