आमदार राम शिंदे आता विधान परिषदचे संभापती
चर्चेतील बातचीत @पत्रकार शिवाजी घाडगे
शेवटी एकनिष्ठ तेला फळ असते अस म्हणतात असेच काही आमदार राम शिंदे यांच्या बरोबर झाले मात्र त्या साठी त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मैत्री देखील कामाला आलीच
कर्जत -जामखेड मतदार संघात तसा आमदार राम शिंदे यांचा दोनदा पराभव झाला पहिल्यांदा पराभव झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवर घेण्यात आले व नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला पराभवानंतर त्याच्या डोळ्यात पाणी आले बरोबर आहे आपल्या पक्षाचे बहुमत झाले व आपल्या पराभव स्विकारावा लागला तसे आ राम शिंदे याचा स्वभाव सरळ व मित भाषी गेली दहा पंधरा वर्ष ते भाजपाचे आमदार राहीले मागील फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यानी मंत्री म्हणून कार्य केले होते मात्र आमदार रोहीत पवार यांना बारामती अथवा पुण्यात आपल्या राष्ट्रवादी मध्ये उमेदवारी मिळणार नाही याची जाणीव व खात्री असल्याने त्थांनी नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मध्ये आपला मोर्चा वळविला तसे पहिल्यांदा ते चांगल्या मताधिक्याने आमदार झाले यावेळेस मात्र राष्ट्रवादी एस पी गटाचे ते एकमेव आमदार आहेत म्हणजे जिल्ह्यातील एक ही व्यक्ती या पक्षाचा आमदार होऊ शकला नाही
आमदार राम शिंदे यांना जेव्हा मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही मात्र त्यांना आता सभापती पद मिळणार आहे आता मात्र त्यांना मंत्र्यांना देखील संभापती मोहदय असे आदर पुर्वक प्रोटोकॉल नुसार म्हणावे लागेल
कदाचित मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही म्हणून आ राम शिंदे यांनी देखील नशीबाला दोष दिला असेल मात्र त्यांना काय ठाऊक नशीब आपल्या सभापती पद बहाल करणार आहे
आता जिल्ह्यात आमदार राम शिंदे येतील ही तेव्हा सभापती बनकर हेच खरे
विधानपरिषदेच्या 19 व्या सभापतीपदी प्रा. राम शिंदे यांची एकमताने निवड झाली
विधानपरिषदेच्या सभापतीपदी विधानपरिषद सदस्य प्रा. राम शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव सदस्य श्रीकांत भारतीय, उमा खापरे व शिवाजीराव गर्जे यांनी मांडला. त्यास सदस्य मनीषा कायंदे, सदस्य अमोल मिटकरी व सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अनुमोदन दिले.
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रा. राम शिंदे यांचा परिचय करून दिला.
आमदार प्रा राम शंकर शिंदे
विधानपरिषद सदस्य, माजी मंत्री
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या माहेरचे नववे वंशज.
प्रा. राम शंकर शिंदे
जन्मतारीख - 1 जानेवारी 1967
शिक्षण – एम. एस्सी, बी.एड.
(वनस्पतिशास्त्र शरीरशास्त्र)
पत्ता - मु.पो. चौंडी, ता. जामखेड,
जि.अहिल्यानगर
भारतीय जनता पार्टीने दिलेल्या जबाबदाऱ्या आणि कार्यकाळ प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा युवा मोर्चा, महाराष्ट्र राज्य-2004 ते 2006
तालुकाध्यक्ष, भाजपा जामखेड तालुका-2006 ते 2009
जिल्हाध्यक्ष, भाजपा, अहिल्यानगर 2010 ते 2012
सरचिटणीस, भाजपा, महाराष्ट्र राज्य 2013 ते 2015
प्रदेश उपाध्यक्ष, भाजपा, महाराष्ट्र राज्य-2021
सदस्य, भाजपा, कोअर कमिटी, महाराष्ट्र राज्य-2022
लोकप्रतिनिधी आणि कार्यकाळ-
सन 2000-2005 - सरपंच, ग्रामपंचायत चौंडी
सन 2009-2014 - आमदार
227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 12,500 मतांनी विजयी.
2014-2019 आमदार
227 कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून 38,000 मतांनी विजयी.
सन 2014-2016 या दरम्यान गृह, कृषी, आरोग्य व पर्यटन विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम केले.
सन 2016-2019 या दरम्यान जलसंधारण, राजशिष्टाचार, ओबीसी कल्याण, वस्रोद्योग व पणन या विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून काम केले.
सन 2016 ते 2019 या दरम्यान तत्कालिन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला " जलयुक्त शिवार अभियान " हे जलसंधारण विभागांतर्गत प्रा.शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात राबवण्यात आले.
Comments
Post a Comment