Posts

डाॅ भाकरे अधिष्टाता

Image
डॉ. बापूसाहेब भाकरे यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या अधिष्ठाता पदाचा अतिरिक्त पदभार  महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील मृदा विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग  प्रमुख डॉ. बापूसाहेब भाकरे यांना अधिष्ठाता (कृषी) या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. डॉ. भाकरे यांनी 1999 मध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथून मृद विज्ञान या विषयातील पीएच डी ची पदवी संपादन केली आहे. कृषी विद्यापीठातील त्यांना विविध पदांचा 38 वर्षाचा अनुभव असून त्यांनी नियंत्रक तसेच पदवीत्तर महाविद्यालयाचे सहयोगीअधिष्ठाता म्हणून अतिरिक्त पदभार सांभाळलेला आहे. त्यांनी तीन आंतरराष्ट्रीय परिसंवाद, पाच राष्ट्रीय परिसंवाद व दोन राज्यस्तरीय परिसंवादाचे संयोजन सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी आतापर्यंत 19 एम. एस. सी. कृषी आणि पाच आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.  राज्यस्तरीय तसेच विविध केंद्रीय समित्यांवर सदस्य म्हणून ते काम पाहत आहेत. त्यांचे आतापर्यंत 142 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले असून  31 पुस्तके तसेच पुस्तकातील अध्याय प्रकाशित...

शेताच्या पाणी द्यायला स्पिकलर

Image
कमी पाण्यात जास्त उत्पन्नाची हमी देणारी ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’  पावसाच्या पाण्याच्या प्रत्येक थेंब अण थेंबास अत्यंत महत्व आहे. ज्या ठिकाणी पाटाद्वारे पाणी देणे शक्य नसते. अशा प्रदेशामध्ये सूक्ष्म सिंचनाच्या माध्यमातून पिकांना पाण्याची उपलब्धता दिल्यास उत्पन्नामध्येही वाढ होते तसेच पाण्याचीही बचत होते. याच उद्देशाने सूक्ष्म सिंचन म्हणजेच ठिबक सिंचनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेती क्षेत्राला पाण्याची उपलब्धता देण्याच्या उद्देशानेच ‘प्रती थेंब अधिक पीक योजना’ राबविण्यात येत आहे. पाण्याची कार्यक्षमता वाढविण्यासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाखालील क्षेत्र वाढविणे. अचूक पाणी व्यवस्थापनाद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे. पिकांची व्याप्ती वाढविणे, सूक्ष्म सिंचन पद्धतीच्या वापरास चालना देणे. कृषी आणि फलोत्पादन विकासासाठी सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा प्रचार, विकास आणि प्रसार करणे. कुशल आणि अकुशल व्यक्तींसाठी सूक्ष्म सिंचन प्रणालींची स्थापना आणि देखभाल करण्यासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, असा या योजनेचा उद्देश आहे.  या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन संचाच्या खर...

अवकाळी पावसाने मोठे नुसकान-लांबे

Image
नुसकान  राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लगेच पंचनामे करून मदत करावी सुरेश लांबे पाटील राहुरी विधानसभा कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात या आठवड्यामध्ये अवकाळी पाऊस झाल्याने कांदा व इतर भुसार मालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून शासन व प्रशासन यांनी तातडीने पंचनामे करून अतिवृष्टीचे पहिले अधिक चालू असे एकरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्वरित जमा करावी अन्यथा सरकार मध्ये सहभागी असून सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षाला आंदोलन करावे लागेल असा इशारा राहुरीचे तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी दिला लांबे पाटील हे राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने वरवंडी येथे मतदाराच्या गाठीभेती घेत असताना वरवंडी येथील मतदार भाऊसाहेब सिद्धू काळे यांच्या घरी गेले असता त्यांचे कुटुंब चिंताग्रस्त अवस्थेमध्ये बसलेले असताना त्यांनी त्यांच्या चार एकर कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दिली त्यावेळी त्यांच्या शेतात समक्ष जाऊन पाहणी करून तुमच्या भावना शासनापर्यंत पोहोचून तुम्हाला तुमच्या पिकाचे पंचनामे करून शासनाकडून तातडीने मदत मिळण्य...

तिसऱ्या दिवशी ही अवकाळी पाऊस

Image
अवकाळी  गेल्या तीन दिवसांपासून ऊन्हाळ्यात पाऊस कोसळत आहे यांचा परिणाम शेती सह शित पेय व्यावसायिक यांच्या वर झाला शुक्रवारी तर काही ठिकाणी गारा पडल्याने मोठे नुसकान झाले हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी 6 ते 7 एप्रिल 2023 अवळाळी पाऊसाचा अंदाज वर्तविला होता तो तंतोतंत खरा ठरला  अवकाळी पाऊसा मुळे मोठे नुकसान झाले आहे नुसकानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकरीवर्ग करीत आहे 

जलनायक पत्रकार शिवाजी घाडगे यांचे कृषीविषयक लिखाण मार्गदर्शन

Image
लिखाण मार्गदर्शक  भारत सरकार च्या केद्रीय जल शक्ती मंत्रालय  वतीने पत्रकार शिवाजी घाडगे यांना जलजागृती करुन प्रबोधनात्मक लेख वर्तमान पत्रातुन प्रसिध्द केल्या बद्दल राष्ट्रीय जल पुरस्कार तसेच जलनायक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे शेतकरी,शेतमजूर व कष्टकरी व कृषी विषयक लिखाण मार्गदर्शन करणारे असलचे प्रतिपादन सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील यांनी व्यक्त केले 

ग्रंथपालन वर्ग सुरु

Image
ग्रंथपालन वर्ग ग्रंथपालन  ग्रंथपालन प्रमाणपत्र कोर्सेचे  राहुरी येथे सुरुवात शुक्रवारी संत गाडगेबाबा आश्रम शाळेत उद्घाटन संमारभ झाला  ग्रंथमित्र सुरेश हरेल विद्यार्थाना मार्गदर्शन करताना म्हणाले महाराष्ट्र ग्रधालय संचालनालयामार्फत हा दोन महिन्याचा कोर्स जिजाजामाता ग्रंथालय चालवते गेल्या अनेक दिवसांपासून हा कोर्स नगर जिल्ह्यात सुरू आहे राहुरी येथे दिवगंत ग्रंथमित्र मुरलीधर नवाळे याच्या प्रयत्ना मुळे हा कोर्स राहुरीत अगदी माफक फी मध्ये चालविला जात आहे  हा दोन महिन्याचा वर्ग चालवताना अनेक अडचणीला सामोर्य जावे लागते एकीकडे डीएड बंद झाले आहे ऐके काळी या कोर्स साठी मिरिट लिस्ट लावली जायची 120 विद्यार्थी प्रवेश घ्यायचे आता ही संख्या निम्यावर आली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ग्रंथपाल भरती होऊ शकली नाही आहे ते ग्रंथपाल दोन शाळा मिळुन पुर्ण वेळ करणे गरजेचे आहे तसेच नवीन सार्वजनिक ग्रंथालय नवीन मान्यता सुरु होने गरजेचे आहे  ग्रंथालये हे सार्वजनिक वैचारिक चळवळीचे केंद्र आहेत उपाशी पोटी पुर्ण कामाची आपेक्षा ठेवणे योग्य नाही ग्रंथालय ही उत्पन्न देणारी नसली तरी वैचा...

माध्यमाचे भवितव्याबाबत चिंता -सामनाचे राऊत

Image
खा राऊत चिंता माध्यमाची  संजय राऊत : वृत्तपत्रासह सर्वच स्तंभ विकलेले   'देश हा भांडवलदारांच्या हातामध्ये गेला आहे ,आज न्यायालय जनतेचे आहे की नाही, ज्या स्वायत्त संस्था आहेत, त्या सुद्धा स्वायत्त राहिल्या नाहीत, वृत्तपत्राचे मालक हे कोणा एका व्यक्तीच्या अधीन गेले आहेत. संसदेला टाळ लागल्या आहे, प्रशासन हे गुलामासारखा पायरीवर बसलेला आहे. हे सर्व पाहता  समाजाला आता दिशा देण्याचे काम हे पत्रकारांना करायचे असून पत्रकारांनी आता जे काही सत्य आहे, ते समाजापुढे मांडले पाहिजे. क्रांतीची ठिणगी ज्या विचारातून पडली, तो पत्रकारांचा विचार आज अशाच पद्धतीने तेवत राहिला पाहिजे,' असे मत शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. हे सरकार कसले? ही तर टोळी आहे. टोळीचा एन्काऊंटर होत असतो, जनताच एन्काऊंटर करेल असा घाणाघात राज्यसरकार केला.  नगर जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी मराठी पत्रकार परिषद आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व पत्रकार मेळाव्याचे आयोजन शारदाबाई पवार सभागृहात करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी पत्रकार परिषदेच...