Posts

स्वाभिमानीचे रवि मोरे शिवसेनेत

Image
बेक्रींग @घाडगे न्युज  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवि मोरे शिवसेनेत  गेले अनेक वर्ष राजु शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एक लढवय्या शिलेदार म्हणून ज्यांची ओळख होती तसेच अनेक आंदोलन करुन शेतकरी प्रश्नाला वाचा फोडणारे रवि मोरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे  युवा नेते राजु शेटे, हिंदुरक्षक सागर बेग यांच्या नंतर तिसरे मोठे चळवळीतील नेते शिंदे शिवसेनेच्या हाती लागले आहे तर मुळ शिवसेनेची मरगळ काही हटायला तयार नाही 

लैंगिक अत्याचार जागा उपलब्ध करुन देणाऱ्या राहुरीच्या त्या दोन लाॅज वर कायदेशीर कारवाई

Image
लैंगिक अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणाऱ्या त्या दोन लॉज  चालकांवर कायदेशीर कारवाई बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणत्याही बालकावर अर्थात अठरा वर्षाखालील कमी वयाच्या बालकावर कोणत्याही स्वरूपाचा लैंगिक अत्याचार झाला असेल तर असा लैंगिक अत्याचार करणारा व्यक्ती हा आरोपी असतो.      परंतु याच कायद्यातील  काही कलमानुसार असा अत्याचार करणे सोपे होईल अशा स्वरूपाची मदत करणारा देखील सह आरोपी असतो व त्यालाही मुख्य आरोपी इतकीच शिक्षा असते. याचाच अर्थ  अशा स्वरूपाच्या अत्याचारासाठी जागा उपलब्ध करून देणारा जागा मालक अर्थात हॉटेलचा,लॉजचा मालक/ चालक,कॅफे चालक/ मालक इत्यादी देखील या कायद्यानुसार आरोपी असतात व त्यांना देखील लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी इतकीच अर्थात दहा वर्षापेक्षा जास्त कारावासाची  शिक्षा असते.      या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुरी पोलीस स्टेशन येथे बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीने लैंगिक अत्याचारासाठी दोन वेगवेगळे लॉजचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे...

दोन यंत्र आले पेटंट वर

Image
महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कृषी यंत्रांना मिळाले पेटंट       महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प कार्यरत आहे. या प्रकल्पामध्ये संशोधित केलेल्या विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्र व ट्रॅक्टरचलित फळबाग तण कापणी यंत्र या दोन यंत्रांना भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने पेटंट प्रदान केले आहे. या दोन यंत्रांच्या संशोधनात महत्वाचे योगदान देणारे अखिल भारतीय समन्वित कृषी अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. तुलसीदास बास्टेवाड तसेच त्यांचे सहकारी डॉ. रवीकिरण राठोड, डॉ. संजय भांगरे, इंजि. गोविंद काळे यांचे नांव पेटंट प्रमाणपत्रावर नमुद करण्यात आले आहे. सदरचे पेटंट मिळविण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांचे मार्गदर्शन मिळाले.          विद्युत मोटरचलित भुईमूग शेंगा तोडणी यंत्राची सरासरी तोडणी क्षमता 178 किलो प्रति तास असून लहान व सीमांत शेतकर्यांसाठी  उपयुक्त आहे. या यंत्राच्या...

जिल्हयातील 30 साहयक फोजदारांना पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती

Image
जिल्ह्यात 30 साहयक फौजदारांना  पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती बेक्रींग @पत्रकार शिवाजी घाडगे  अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या तीस सहाय्यक फौजदार यांना मंगळवारी पदोन्नतीवर पोलीस उपनिरीक्षक पदी बढती दिल्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी आदेश निर्गमित केले असल्याने या पोलीस बांधवांच्या कुटुंबात दुसर्या आगोदरच दिवाळी साजरी झाली आहे 25फेबुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही पदोन्नती देण्यात आली आहे 

अँटी रॅगींग दिवस साजरा

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठात अँटी रॅगींग डे साजरा प्रेमाने आणि सहकार भावनेने वागल्यास विद्यार्थी जीवन आनंदी होते  राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सुनील भणगे रॅगींगमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाद होतात, मानसिक नैराश्यात जातात त्यामुळे शिक्षणावर परिणाम होतो. पदव्युत्तर महाविद्यालयात आलेले विद्यार्थी हे समजुतदार असतात. आपले पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी हे ध्येयवेडे आणि करिअर ओरियंटेड असल्याने ते कधीच रॅगींगच्या फंदात पडत नाहीत ही एक कौतुकाची बाब आहे. विद्यार्थ्यांनी एकमेकांबरोबर प्रेमाने आणि सहकार भावनेने वागावे. यामुळे विद्यार्थी जीवन आनंदी होते असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सुनील भणगे यांनी केले.  महात्मा फुले कृषि विद्यापीठातील पदव्युत्तर महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली अँटी रॅगींग डे साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शन करताना डॉ. सुनील भणगे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर पदव्युत्तर महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा आंतरविद्याशाखा जलव्यवस्थान विभाग प्रमुख...

किर्तनकारांनी धर्माचा प्रसार करावा पक्षाचा नाही -ह .भ .प किरण शिदे

Image
कीर्तनकारांनी धर्माचा प्रचार करावा पक्षाचा नाही  सर्वच पक्षात हिंदु आहेत  ह .भ .प किरण महाराज शिंदे (फडकरी वारकरी )हिंदुराष्ट्र सेना संघटन 9922536303, वारकरी संप्रदाय हा सर्वाना बरोबर घेऊन चालणार आहे   महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. 18 पगड जाती मध्ये संतांनी अवतार घेतले हे सर्वज्ञात व सर्वश्रुत आहे. जगाच्या पाठीवर सर्व मानव जातीला सामावून घेणारा वारकरी संप्रदाय आहे. परमेश्वराचे संपूर्ण ज्ञान त्याचे स्वरूप अगदी सहजपणे सोप्या भाषेत_ जगासमोर संतांनी उभ केल आहे. अनेक जातीपंथातील अध्यात्मिक, परमार्थिक कीर्तनकार रोज आपल्या प्रवचनातून कीर्तनातून अध्यात्मज्ञानाच्या माध्यमातून समाजाला आंतरिक शांतता_ देण्यासाठी नामस्मरणाच्या,भजनाच्या बळावर सदैव पूर्ण वेळ सक्रिय असतात व अशा प्रबोधकांना समाज सर्वतोपरी सहकार्य ही करतो वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचा आत्मा आहे. वेदांत सर्व व्यापक वेदोक्त ज्ञान सरळ भाषेत सोपं करून संतांनी कुठलाही भेदभाव न ठेवता मानव जातीला दिला असताना आपला हिंदू धर्म अगदी व्यापकपणे मानव जातीला सांगितला असताना या तत्त्वज्ञानाच्या अनुकरण करणारे वर्तमानातील...

भांड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जणांचा जळुन मुत्यु

Image
बेक्रींग न्युज @पत्रकार शिवाजी घाडगे  भांड्याच्या दुकानाला आग लागून एकाच कुटुंबातील पाच जनाचा भाजुन मुत्यु नेवासा फाटा येथील कालिका फर्निचरला भीषण आग लागल्याची दुदैवी घडली यात पाच जणांचा होळपळुन मृत्यु झाला असून ही आग रविवारी मध्यरात्रीनंतर लागली.   दुकानाच्या वरती मालक मयुर रासने यांचे निवासस्थान असल्याने आगीचा लोळ तीथपर्यंत पोहोचला. या घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. आगेचे कारण मात्र समजू शकले नाही. आग मोठ्या प्रमाणात असल्याने या घटनेत मयूर अरुण रासने वय (४५ वर्ष, ), पायल मयूर रासने वय (३८ वर्ष ),अंश मयूर रासने (वय १० वर्ष ),चैतन्य मयूर रासने (वय ७ वर्ष ) वयोवृद्ध महिला सिंधूताई  चंद्रकांत रासने (वय ८५)  अशा एकाच कुटुंबातील ५ जणांचा  मृत्यू झाला आहे. या घटनेत यश किरण रासने वय २५ वर्ष हा जखमी झाला आहे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहे