Posts

धुळीत हरवले प्रश्न की नवे राजकीय समीकरणे

Image
 धुळीत हरवलेले प्रश्न की नवे राजकीय समीकरण? रंग तरंग घाडगे न्यूज  ।शिवाजी घाडगे  राहुरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीची घोषणा होताच स्थानिक राजकारणाला पुन्हा एकदा वेग आला आहे. देशातील काही विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करताना निवडणूक आयोगाने   राहुरी मतदारसंघाचाही त्यात समावेश केला आहे. कार्यक्रमानुसार २३ एप्रिल २०२६ रोजी मतदान तर ४ मे रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आगामी काही आठवडे राहुरीत राजकीय हालचाली, आरोप-प्रत्यारोप आणि रणनीतींची चुरस पाहायला मिळणार हे निश्चित आहे. योगायोग असा की पोटनिवडणुकीची घोषणा झाली, तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहुरीतच होते. त्यांच्या हेलिकॉप्टरने उड्डाण घेताच हवेत उडालेली धूळ खाली बसण्याआधीच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुरी आणि बारामतीच्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारणात शक्यता आणि अशक्यता यांची सीमा फारच पातळ असते, हे खरे असले तरी लोकशाही व्यवस्थेत बिनविरोध निवडणूक ही अपवादात्मक गोष्ट असते. कारण निवडणूक लढव...

राहुरी व बारामती विधानसंभा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी

Image
राहुरी व बारामती पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घाडगे न्यूज| प्रतिनिधी राहुरी आणि बारामती विधानसभा मतदारसंघातील होऊ घातलेल्या पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात, असे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. मात्र, निवडणूक झाल्यास भारतीय जनता पक्ष लढण्यासाठी पूर्णपणे सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रविवारी राहुरी  येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठा मध्ये आयोजित करण्यात आलेल्या दीक्षांत समारंभानिमित्त ते उपस्थित होते. यावेळी विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमानंतर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी राहुरी व बारामती पोटनिवडणुकांबाबत आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील राजकीय वातावरण लक्षात घेता काही पोटनिवडणुका बिनविरोध होण्याची परंपरा अनेकदा पाहायला मिळते. त्यामुळे राहुरी आणि बारामती या दोन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुका देखील सर्व पक्षांच्या सहमतीने बिनविरोध व्हाव्यात, अशी अपेक्षा आहे. मात्र, लोकशाही प्रक्रियेचा आदर ...

मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांना डॉक्टर पदवी

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ मानद पदवीचा बहुमान महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात होणार सन्मान घाडगे न्यूज । प्रतिनिधी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’  ही मानद पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात रविवारी सकाळी १० वाजता हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येणार असून राज्याच्या प्रशासनात तसेच विकासाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानाची दखल घेत हा गौरव केला जात आहे. सन १९६९ मध्ये स्थापन झालेले महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे राज्यातील अग्रगण्य कृषी शिक्षण व संशोधन केंद्र आहे. शिक्षण, संशोधन आणि कृषी विस्ताराच्या माध्यमातून दहा जिल्ह्यांमधील शेतकरी आणि विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य विद्यापीठ करत आहे. विद्यापीठाच्या वतीने दर दोन वर्षांनी दीक्षांत समारंभाचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात कृषी व इतर शाखांतील पदवीधरांना राज्यपाल तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पदव्या...

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल

Image
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे मुंबईत दाखल; राहुरी पोटनिवडणुकीची उत्सुकता शिगेला यह भगवा रंग | शिवाजी घाडगे राहुरी विधानसभा पोटनिवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसा राजकीय सस्पेन्स अधिकच वाढत चालला आहे. दरम्यान, राहुरी नगरपालिकेचे नियोजित कार्यक्रम रद्द करून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अचानक मुंबईकडे धाव घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून यह भगवा रंग ची जोरदार चर्चा असून नेमका कोणावर कोणाच्या बाणाने पुन्हा विधानसभेत पोहोचणार  मुंबईतील विधानभवन परिसरात दुपारच्या सुमारास प्राजक्त तनपुरे विविध नेत्यांशी हस्तांदोलन करत आत्मविश्वासाने वावरताना दिसले. मात्र, येणारी निवडणूक नेमकी कोणत्या पक्षाच्या तिकिटावर लढवणार, याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या पुढील राजकीय पावलांबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे. आगामी काळात कोणते राजकीय डावपेच आखले जातील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी राहुरी दौऱ्यात बोलताना या मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने युवा नेतृत्वाला संधी द्यावी, अशी भूमिका मांडली. भाजप युवा आघाड...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आता डॉक्टर

Image
मुख्यमंत्री फडणवीस होणार ‘डॉक्टर’ घाडगे न्यूज।प्रतिनिधी   राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडून ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी (१५ मार्च) विद्यापीठाचा ३९ वा पदवीप्रदान समारंभ आयोजित करण्यात आला आहे. हा समारंभ राज्यपाल विष्णू देव वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. या समारंभात एकूण ४ हजार ६०२ विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पीएच.डी. पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत. त्यापैकी ४ हजार १८२ विद्यार्थ्यांना पदवी, ३४६ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी, तर ७४ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात येणार आहे. तसेच ४२ गुणवंत विद्यार्थ्यांना सुवर्णपदके व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे तसेच विधी व न्याय राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक डॉ. अशोक कुमार सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून...

पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा गौरव

Image
पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा साई प्रतिष्ठानकडून स्नेह सत्कार      समाजातील विविध घटकांचे योगदान अधोरेखित करत त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्याची परंपरा जपणाऱ्या साई प्रतिष्ठान, देवळाली प्रवरा यांच्या वतीने महिला दिन औचित्य साधून गुरुवारी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा भावपूर्ण सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. समाजातील पडद्यामागे राहून कुटुंबाचा आधार बनणाऱ्या या महिलांच्या त्यागाची दखल घेत हा उपक्रम राबविण्यात आला. साई मंदिरात सायंकाळी आरती झाल्यानंतर मंदिरासमोरील प्रांगणात हा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पत्रकार समाजासाठी दिवस-रात्र कार्य करत असताना त्यांच्या कुटुंबीयांना अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. विशेषतः त्यांच्या पत्नी कुटुंबाची धुरा सांभाळत त्यांना सामाजिक कार्यासाठी प्रेरणा देत असतात. या निस्वार्थ योगदानाची कदर म्हणून पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला. या उपक्रमाची परंपरा साई प्रतिष्ठानने काही वर्षांपासून जपली आहे. पहिल्या वर्षी देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांच्या पत्नींचा सन्मान करण्यात आला होता. दुसऱ्या ...

तनपुरेची गुगली बदलतील राजकीय समीकरणे

Image
 तनपुरेंची ‘गुगली’ बदलतील राजकीय समीकरणे तंरग घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  राहुरी मतदारसंघातील आगामी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे संपूर्ण राजकीय समीकरण ढवळून निघाले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पुत्र अक्षय कर्डिले यांच्या बाजूने निर्माण झालेली सहानुभूतीची लाट ही भाजपसाठी मोठी राजकीय ताकद मानली जात होती. मात्र प्राजक्त तनपुरे यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चेने या सहानुभूतीच्या लाटेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पोटनिवडणुकीपूर्वीच आपल्या नावाची चर्चा मतदारांमध्ये निर्माण करत तनपुरे यांनी राजकीय मुत्सद्देगिरी दाखवली आहे. त्यांनी अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली तरी त्यांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरणात उत्सुकता आणि अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यामुळे राहुरीतील राजकीय समीकरणे कोणत्या दिशेने वळतील, याबाबत विविध तर्कवितर्क सुरू आहेत. यापूर्वीच्या निवडणुकीत दिवंगत आमदार शिवाजी कर्डि...