राहुरीला खमक्या पोलीस निरीक्षक पाहीजे
जन की बात @पत्रकार शिवाजी घाडगे
एस पी राकेश ओला
राहुरीला खमक्या पोलीस निरीक्षक द्या की!!
राहुरी पोलीस स्टेशन ला नवीन पोलीस निरीक्षक आज ना उद्या येईल जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना राहुरी पोलीस ठाण्याची कल्पना आहेच कारण त्यांनी काही काळ श्रीरामपूर संभाळे आहे मुळा नदीत पळुन वाळु चोर पकडण्याचे धाडस राकेश ओला यांनी दाखवलेले आहे हे राहुरीकरानी उघड्या डोळ्यांनी पाहीले
राहुरीत पोलीस निरीक्षक शेळीमकर याच्या वर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ने कारवाई केल्या पासून कोणीच पोलीस निरीक्षक त्याना असलेल्या निवासस्थान मध्ये राहायला तयार नाही संगळेच आलेले विद्यापीठ च्या अतिथीगृहात राहातात तेव्हा आता किमान पोलीस ठाण्या जवळील निवासस्थान वास्तव करणारा खमक्या पोलीस निरीक्षक राहुरीला मिळायला हवा तसेच त्याला नागरिकाच्या प्रश्नांची जाण असावी सेवानिवृत्तीला जवळ आलेला नसावा कारण तो केवळ दिवस काढतो चारित्र्य पडताळणी ही त्यांला खिरापत वाटतोय असा भास व्हायला नको
तो गुन्हेगाराचा कर्दन काळ व खाकीचा धाक वाढवणारा असावा
कारण शनिशिगणापुर व शिर्डी जागतिक देवस्थान मधील महत्वाचे स्थान हे राहुरी आहे शेतकरयांना आपल्या वीज मोटारी आबादीत राहतील तसेच राज्य मार्गावरील रात्री वाहन चालक बिनधास्त प्रवास करतील अशी खात्री त्याची देखील होईल राहुरी हे अतिशय शांत व सोशिक आहे राहुरी पोलीस ठाण्याची इमारत तसेच पोलीस बांधवांच्या निवासाचा प्रश्न देखील सुटला पाहीचे तुर्त एखादा खमक्या पोलीस निरीक्षक द्या म्हणजे झाले
Comments
Post a Comment