जीवे ठार मारायचे का?

जीवे ठार मारायची गरज होती का?
••••••••••••••••••••••••••••••••••
पहिली ओळ @पत्रकार शिवाजी घाडगे
••••••••••••••••••••••••••••••••••••

सावळीविहीर येथे नवऱ्याने सासुरवाडी कडील चौघांना धार दार शस्त्र ने जीवे ठार केले तर एकलहरे येथे बायकोने नवऱ्याला ठार मारले 
एका घटनेत नवरा आरोपी आहे तर दुसर्या घटनेत बायको खरच नवरा बयकोच नात इतक कमजोर झाले की दोघे ही एक मेकांच्या जीवावर उठले  दोन्ही घटनेत मृत्यूचे आकडे कमी जास्त असतील मात्र नाते मात्र एकच होते. प्रेमाची नाते रक्ताळली 
सावळीविहीर येथील घटनेतील अरोपी सुरेश निकम याला व त्याचा चुलत भाऊ रोशन निकम याला पोलीसांनी मोटारसायकल वरून पळुन जाताना शिदे नाक्यावर नाशिक येथे ताब्यात घेतले व एकलहरे येथील घटनेत बायकोनेच नवरा मारुन दरोड्याचा बनाव केला बुशिरा पठाण हीला पोलीसांनी ताब्यात घेतले तसे दोन्ही घटनेतील अरोपी पोलीसांनी झटपट पकडले हे विशेष घरातील व्यक्तीवर संशय तरी कसा घ्यायचा मात्र पोलीसांनी अरोपी पकडून खुनी ताब्यात घेतले मानसे मारणे ईतके सोपे झाले का शुल्लक गोष्टीवरून नवरा बायको मधील मतभेद एक मेकांच्या जीवावर उठतात 
सुरेशच्या लग्नाला 12 वर्ष झाले होते बायको वर्षा जवळ राहत नव्हती म्हणून सुरेशने अख कुटुंबावर घाव घातला तर बुशराच्या लग्नाला नऊ वर्ष लोटले होते नवरा नइम पठाण याचा गळा घोटला 
पावसाने झोडपले व राज्याने झिटकारले तर न्याय कोणाकडे मागायचा तस पती पत्नीचे वैवाहिक संबध मधुर असतात त्यात एकदा संशयाची पाल घुसली की वाटोळे झाल्या शिवाय रहात नाही अनेक ठिकाणी कौटुबीक हिसाचारा चे गुन्हे दाखल आहेत एकादा दोरा तुटला की गाठ बसते किवा तुटतो त्या प्रमाने नात्याच असत एकदा तूटल की तुटलच मग बाकीचे लुटायला मोकळे असतात आज एक तर विवाह उशीरा होतात व झाले तरी टिकत नाहीत काही ठिकाणी पुरुष संशयी असतात तर काहीत महिला मोबाईल मुळे तर पती पत्नी एकाच काॅट वर आपआपल्या मोबाईल वर चॅट करतात आपण आपले चांगले संस्कारा पासून दुर होत चंगळवाद स्विकारतोय कोराना मध्ये अनेकजण अणअपेक्षीत पणे जग सोडून गेले आपण यात वाचलो मग राग मनात धरून आपल्याच व्यक्तीचा काटा काढायचा का तेव्हा पेल्यातील वादळ पेल्यातच शमवने गरजेचे असते राग आवळला म्हणजे वाघ आवळल्या सारखे आहे तेव्हा राग व्यक्त करा पण रागाने नाते संपवु नका त्याग महत्वाचा वाईट वेळ प्रतेकावर येवुन जाते नियम व सयम ठेवा दिवसेंदिवस मुलीच प्रमाण घटत चालले आहे आज अनेकजणाचे विवाह वय उलटून गेले आहे नवरा बायको म्हणजे काॅपिटर मधली प्रिंन्ट नाही जी जशीच्या तशी येईल तेव्हा जुळवून घ्या 
अनैतिक संबंधा मुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत तेव्हा नितीने वागा नीती मरु देत नाही तरी देखील वरील दोन्ही घटनेत मारायची गरज होती का हा प्रश्न तुमच्या ही मनात आल्या शिवाय राहणार नाही 



Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार