शंकर पगारे यांचे दु:ख निधन

शंकर नाथा पगारे यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

 आदिनाथ वसाहत येथील ज्येष्ठ नागरिक शंकर नाथा पगारे (वय ८२) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने  परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. शंकर पगारे हे तनपुरे सहकारी साखर कारखान्यात अनेक वर्षे सेवा बजावून सेवानिवृत्त झालेले कर्मचारी होते. आपल्या सेवाकाळात त्यांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा व मेहनतीच्या जोरावर सहकाऱ्यांमध्ये विश्वास संपादन केला होता. अत्यंत साधे जीवन जगत त्यांनी आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवला.
अतिशय खडतर परिस्थितीतून मार्ग काढत त्यांनी जीवनात अनेक अडचणींवर मात केली. कष्ट, संयम आणि मूल्यनिष्ठेचा आदर्श त्यांनी आपल्या कुटुंबासमोर ठेवला. त्यांच्या स्वभावातील आपुलकी, शांतपणा आणि सामाजिक बांधिलकीमुळे ते परिसरात सर्वप्रिय होते.
त्यांच्या पश्चात आर.पी.आय.चे माजी अध्यक्ष तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे, तसेच रावसाहेब पगारे, अरुण पगारे, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
कै. शंकर पगारे यांच्या पार्थिवावर गुरुवारी सकाळी ११ वाजता निर्मलकृष्ण धाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाबद्दल विविध सामाजिक, राजकीय व सहकारी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर