अवकाळी पाऊसाने नुकसान भरपाई शिवसेना शिष्टमंडळ प्रांताना भेटले
अवकाळी अवकाळी पाऊसाने झालेल्या नुसकानीचे पंचनामे न झाल्याने देवळाली मंडळातील शेतकरी नुकसान भरपाई पासुनवंचीत. नुकसान भरपाई मिळावी म्हणुन शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळाने घेतली श्रीरामपुर प्रांताधिकाऱ्यांना भेटले देवळाली प्रवरासह ३२ गावांत गेल्या वर्षी सततचा पाऊस न् अतिवृष्टीमुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले.त्याची भरपाई अद्याप मिळाली नाही.तोच या वर्षी अवकाळी पावसाने पिकांचे प्रचंड नुकसान केले.गेल्यावर्षीची नुकसान भरपाई देवुन या वर्षीच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करावे म्हणुन शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शिष्टमंडळाने माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांचे नेतृत्वाखाली श्रीरामपुर प्रांताधिकारी श्री किरण सावंत यांना भेटुन मागण्याचे निवेदन दिले. गेल्या वर्षी देवळाली मंडळ व ३२ गावांत सततचा पाऊस झाला.त्याचे पंचनामे प्रशासनाने केले.त्याचा नुकसान भरपाईचा अहवाल शासनांस दिला.ती भरपाई मिळण्याचा निर्णय झाला नाही तोच पुन्हा अतिवृष्टी झाली.तिचे पंचनामे करण्याचे आदेश आले.परंतु यापुर्वीच सततच...