Posts

राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी शनि चौथऱ्यावर जाऊन दर्शन घेतले

Image
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतले  शनि दर्शन खरच एक काळ असा होता की महिलांना शनि चौथऱ्यावर जाण्यास मज्जाव होता शनि चौथऱ्यावर जाण्या साठी आदोलन झाली मात्र राष्ट्रपती ना आदराने चौथऱ्यावर नेऊन शनी अभिषेक केला   महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरुवारी शनिशिंगणापूर येथे श्री शनैश्वर मूर्तीचे दर्शन घेत मनोभावे पुजा केली. यावेळी राष्ट्रपतींनी  शनैश्वर मूर्तीस तैलाभिषेकही केला.  यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री  दादा भुसे, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) संजय सक्सेना, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.  अहमदनगर जिल्हा प्रशासनाच्यावतीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी राष्ट्रपतींचा सत्कार केला.   ...

एम पी केव्हीचे प्राध्यापक थायलंडला जाणार

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठातील कास्ट प्रकल्पांतर्गत प्राध्यापक थायलंड परदेश दौर्यासाठी रवाना जागतिक बँक अर्थसहाय्यीत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान प्रकल्प नवी दिल्ली, यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाचे आधुनिक कृषि विज्ञान तंत्रज्ञान केंद्र, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे सुरु करण्यात आले आहे. या प्रकल्पांतर्गत हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापनाकरिता महात्मा फुले कृषि विद्यापीठात कार्यान्वित असलेले प्राध्यापकवर्ग यांना हवामान अद्ययावत शेती व जलव्यवस्थापन विषयी कार्यक्षमतेचे बळकटीकरण करण्यासाठी ड्रोन, रोबोट, आय.ओ.टी., कृत्रिम बुध्दीमत्ता, भौगोलिक प्रणाली, रिमोट सेंन्सींग, अर्थ इंजिन इ. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली थायलंड येथे परदेश दौर्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कास्ट प्रकल्पांतर्गत आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घेण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध कृषि महावि...

अवकाळी पाऊस सुरु

अवकाळी पाऊस सुरु  एकीकडे जायवाडी साठी नगर व नाशिक धरणातून नदीव्दारे पाणी जात असताना रविवारी रात्री अवकाळी पाऊस बरसत आहे  दिवसभर वातावरण ढगाळ होते तर सकाळी धुके व दवबिंदू पडलेले पाहवयास मिळाले

प्रेरणाचे संस्थापक सुरेश वाबळे यांना यशवंतराव चव्हाण पुरस्कार

Image
प्रेरणा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे पाटील यांना स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलनात यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . स्वर्गीय यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य संमेलन यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनी फलटण येथील महाराजा  मंगल कार्यालयात संपन्न झाले. संमेलनाध्यक्ष  व इतिहास संशोधक प्राध्यापक नितीन बानगुडे यांच्या हस्ते मल्टीस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे यांना यशवंतराव चव्हाण सहकार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सन्मान चिन्ह ,सन्मानपत्र व रोग 11000 रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे ,शाखा फलटण व श्री सद्गुरु प्रतिष्ठान फलटण व श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचे स्मृतीदिनी एक दिवशीय  मराठी साहित्य संमेलन फलटण येथील महाराजा मंगल कार्यालयात काल पार पडले. कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील मल्टिस्टेट संस्थेच्या फेडरेशन मार्फत प्रेरणाचे संस्थापक सुरेश वाबळे यांनी उल्लेखनीय कार्य करीत  आहेत. केंद्र व राज्य...

कोपरगाव ची गौरी पगारे महाविजेती

Image
@पत्रकार शिवाजी घाडगे  गौरीला गौवरविले महाराष्ट्रीची महाविजेती  कोपरगावची गौरी पगारे 2023  महाराष्ट्र ची लिटील चॅम्प्स महाविजेती  झी मराठी वाहिनीवरील  सारेगमप लिटिल चॅम्प्स मानकरी जाहीर करण्यात आलीय शनिवारी महाअंतिम फेरीत एकुण सहा स्पर्धक होते तील गौरीला महाविजेती होण्याचा बहुमान मिळाला आहे दिड लाख रुपये व सारेगमप स्मृतीचिन्ह देऊन गौरीला गौरविण्यात आले  तर दुतीय क्रमांक राहुरी चा जयेश खरे हा 

ट्रेडीशनल बेल्ट रेसलिग राज्य उपाध्यक्ष पदी आघाव

Image
ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंगच्या राज्य उपाध्यक्षपदी पहिलवान राजकुमार आघाव पाटील यांची नियुक्ती  युनायटेड वर्ल्ड रेसलिंगची मान्यता असलेल्या ट्रेडीशनल बेल्ट रेसलिंग महाराष्ट्र राज्य संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी पहिलवान राजकुमार लक्ष्मण आघाव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राज्य अध्यक्ष सी.ए. तांबोळी यांनी आघाव पाटील यांच्या नियुक्तीची घोषणा . यावेळी उमर मुख्तार तांबोळी उपस्थित होते.  राजकुमार आघाव पाटील नांदगाव शिंगवे (ता. नगर) येथील असून, त्यांनी जागतिक कुस्तीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करताना तीन वेळा कास्य पदक पटकाविले आहे. ते एक उत्तम कुस्तीपटू असून, नवोदित कुस्तीपटूंना ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी मार्गदर्शन करत असतात. तसेच कुस्ती खेळाच्या प्रचार-प्रसारासाठी सातत्याने त्यांचे कार्य सुरु आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आघाव पाटील यांची संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल जिल्हा सचिव संतोष खैरनार व जिल्हाध्यक्ष संतोष भुजबळ शुभेच्छा दिल्यात 

कौण बनेगा लिटिल चॅम्प्स नगरचे दोघे महा अंतिम फेरीत

Image
 आवाज @पत्रकार शिवाजी घाडगे  झी मराठी च्या गायन सारेगमप लिटिल चॅम्प्स मध्ये महा अतीम फेरी साठी राहुरीचा जयेश खरे व कोपरगाव ची गौरी पगारे याच्या सह  श्रावणी,देवाश, रुषीकेश,आदित्य हे शनिवारी महाअंतिम फेरीत गेले आहेत  गौरी व जयेश यांच्या आवाजाची जादु कायम राहिली अतिशय खडतर परिस्थितीत दोघे ही आपली गायन कला जोपासत आहेत गायन क्षेत्रात उपजतच कला अंगीकार दोघांनी केला असून या दोघांतच खरी रस्सीखेच दिसून येत असली तरी गौरी व जयेश महा अंतिम फेरीत पोहचले ही भुषणाची बाब आहे गाव कुसावरील कलाकार झी शोधून काढून त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे  जयेशचे वडील बॅड वाजवण्याचे काम करतात तर गौरीला वडील नाहीत लिटील चॅम्प्स मध्ये गौरी चमकल्याने गावकऱ्यांनी तीला घर द्यायचे ठरवले आहे  जयेश चा पहाडी आवाज तर गौरीचा कोमल त्यामुळेच जिल्याचे नाव गाजणार यात शंका नाही तर राहुरी की कोपरगाव ठरणार महाराष्ट्र ची शान हे लवकरच स्पष्ट होईल   सारेगमप लिट्ल चॅम्प्स मानकरी  जाहीर होणार होईल  राहुरी तालुक्यातील वाजुळ पोही येथील प्राथमिक शाळेत श...