Posts

सैन्यात अग्निवीर भरती

Image
सैन्यात अग्निवीर भरतीसाठी इच्छुकांनी 22 मार्चपर्यंत अर्ज करावेत    :-  भारतीय सैन्यात भरतीसाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन प्रोफाइल तयार करावी व २२ मार्च, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.   सैन्यदलात अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ऑफिस असिस्टंट, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी आणि ८ वी पास), मिलिटरी पोलिसांसाठी अग्निवीर महिला प्रवर्ग आणि एनए सप्टेंबर मधील नियमित प्रवेशासाठी अर्ज खुले आहेत. फार्मा, टप्पा 01 मध्ये उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना सविस्तरपणे वाचाव्यात.  विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिक दृष्ट्या पात्र व्यक्ती, उत्कृष्ट क्रीडा व्यक्ती आणि माजी सैनिकांच्या मुलांना बोनस गुण आणि शारीरिक मोजमापात सूट दिली जाईल.    सर्व संबंधित तपशील...

देवळाली प्रवरात जनावरांना लाळ्या खुरकुत्या रोगाची लागण

Image
देवळाली परिसरांत झपाट्याने वाढतोय पशुधनावरिल लाळ खुरकुती आजार..शिवसेना ( ठाकरे गट) ग्राहक संरक्षण कक्षाचे दणक्याने प्रशासन सतर्क        देवळाली प्रवरा शहर व आजुबाजुच्या परिसरांत लाळ खुरकुतीचा नवा विषाणु जोमाने पसरला असुन त्यामुळे अनेक गायी न् वासरे मृत्युमुखी पडल्याने शेतकरी हतबल झाला असून दुष्काळात तेरावा अशी परिस्थीती उदभवली आहे.  याबाबत शिवसेना ( ठाकरे गट) ग्राहक संरक्षण कक्षाने आवाज उठविल्याने  वरिष्ठ अधिकारी न् विभागीय रोग अन्वेषणची डॉक्टरांचे पथक देवळाली प्रवरा परिसरांत दाखल झाले.  त्यांनी बाधीत जनावरांचे गोठयावर जात जनावरांची प्रत्यक्ष तपासणी केली. काय खबरदारी घ्यायची तसेच काय उपाययोजना करायची याबाबत शेतक-यांना मार्गदर्शन केले.        यावेळी शिवसेना ( ठाकरे गट)ग्राहक संरक्षण कक्षाचे अहमदनगर जिल्हा संघटक  दत्ता कडुपाटील यांनी याबाबतचे सवीस्तर निवेदन उपायुक्त डॅा तुंभारे यांना दिले.या निवेदनात हि साथ लवकर आटोक्यात आणावी. शासनाकडून ओषधउपचार निःशुल्क व्हावेत.मृत जनावरांची नुकसान भरपाई मिळावी. आदि मागण्या करण्यात ...

ग्रंथउस्वोव जोरात सुरु

Image
अहमदनगर ग्रंथोत्सवाचा थाटात शुभारंभ :- उच्च तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉ. बाबाासाहेब  आंबेडकर सभागृह सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या अहमदनगर ग्रंथोत्सवाचे उदघाटन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.  कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक डॉ.संजय कळमकर, प्रभारी ग्रंथालय संचालक तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकुर, समिती सदस्य तथा ज्येष्ठ साहित्यिक  चंद्रकांत पालवे, अहमदनगर जिल्हा ग्रंथालयाचे अध्यक्ष  शिरीष मोडक, ज्येष्ठ साहित्यिक मेधाताई काळे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष किशोर मरकड, अविनाश येवले, एन.बी. धुमाळ, छत्रपती संभाजीनगरचे सहायक संचालक सुनील हुसे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले की, ग्रंथाचा प्रचार, प्रसार करण्याबरोबर वाचन संस्कृती वाढीस लागण्यासाठी जिल्हा ग्रंथालयामार्फत आयोजित करण्यात आलेला ग्रंथोत्सव हा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य आहे. नागरिकांनी अधिकाधिक ...

कोल्हापुर कृषी महाविद्यालय यांत्रिक दिवसाचे आयोजन

Image
कृषि महाविद्यालय, कोल्हापूर येथे कृषि यांत्रिकीकरण दिवसाचे आयोजन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या राजर्षी छत्रपती शाहु महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी, महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कोल्हापुर तसेच कृषि अवजारे उत्पादन संघटना (AIMA, महाराष्ट्र) यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषि महाविद्यालय, कोल्हापुर येथे मंगळवार दिनांक 5 मार्च, 2024 रोजी कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात येणार आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्यांनी शेतीत जास्तीत जास्त सुधारित यंत्रे व कृषि अवजारांचा वापर करावा हा उददेश ठेवुन आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे संकल्पनेनुसार भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत येणार्या व कृषि विद्यापीठात असणार्या अखिल भारतीय समन्वित कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पामार्फत देशभरात एकाच...

राजे शिवाजी चारित्र्य संपन्न होते-डाॅ सबनीस

Image
छत्रपती शिवाजी महाराज चारित्र्य संपन्न होते     जेष्ठ साहित्यिक                                              डाॅ. श्रीपाल सबनीस        महिलाचा आदर भाव,  नैतिकता व धर्मातीत राजकारण या गोष्टी  आजच्या काळासाठी फार  गरजेच्या व महत्वाच्या  आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः त्याबद्दल  एक आदर्श घालून दिला आहे. शिवरायांनी नेहमी स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली. तसेच त्यांचे राजकारण हे नेहमी धर्माच्या पलीकडचे राहील अशा प्रकारची स्त्री व धर्माविषयीची समतेची दृष्टी ठेवण्याची शिकवण छत्रपती शिवरायांची  होती असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी केले.    महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली  छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५  वी जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना संचालनाल...

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

Image
बेक्रीग @शिवाजी घाडगे  शेअर्स खरेदीत कोट्यावधी बुडाल्याने शेअर्स बोक्रर गेला कुटुंबासह पळुन अनेकाच्या तोडचे पाणी पळले  राहुरी फॅक्टरी येथील घटना  संतोष विनायक भोसले (41) पत्नी भारती (30) मुलगी ओवी (2) आई शकुंतला (71) हे चिचविहरे येथील रहिवाशी असुन घाटा आल्याने संतोष कुटुंबासह बेपत्ता झाला आहे   संतोचा ताथेड काॅपलेक्स मध्ये शेअर्स खरेदी विक्रीचा व्यवसाय होता  अशी चर्चा आहे की ज्या दिवशी संतोष टेडिग मध्ये लाॅस मध्ये गेल्यावर ऑफिस मध्ये भितीला धडका घेतल्या व काही गुंतवणूक दाराना मी तुमचा विश्वास घात केला मला माफ घरा असा संवाद साधून माफी मागितली  संतोष याचा पुर्वी लाॅर्डी व्यावसाय होता शेअर्स खरेदी विक्री शिक्षण घेतले स्वभाव चांगला असल्याने तो लोकप्रिय देखील होता मात्र जास्तीच्या लालुचने घात केला  संतोष निघून गेल्याने सर्व जण चितेत पडले आहेत नातेवाईकांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस तपास करीत आहेत 

शेती साठी आता यात्रिकरण गरजेचे डाॅ तुळशीदास बास्टेवाड

Image
आता शेतीसाठी कृषि यंत्र  गरजेचे   प्रमुख संशोधक डॉ. तुळशीदास बास्टेवाड दिवसेंदिवस शेतीमध्ये मजुरांचा तुतवडा भासत असल्यामुळे शेतकरी बांधवांना शेती करणे सध्या जिकिरीचे बनत आहे.  आधुनिक पध्दतीने शेती करणे होय. आधुनिक शेती करत असताना मजुरांचा तुटवडा तसेच त्यांची कमी होत असलेली कार्यक्षमता यावर मात करण्यासाठी कृषि यांत्रिकीकरणचा अवलंब करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. तुळशिदास बास्टेवाड यांनी केले. भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत अखिल भारतीय समन्वीत कृषि अवजारे व यंत्रे संशोधन प्रकल्प, मफुकृवि, राहुरी आणि कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कृषि यांत्रिकीकरण दिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना डॉ. बास्टेवाड बोलत होते. यावेळी स...