Posts

राजीव गांधी प्रशासकीय गतिमान अभियानात नगर जिल्हासाठी तीन पुरस्कार

Image
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, मुख्याधिकारी विकास नवले आणि मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्कार  राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्ह्याला तीन पुरस्कार प्राप्त झाले असून सह्याद्री अतिथीगृह  येथे आयोजित कार्यक्रमात  राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवले आणि राहता येथील मंडळ अधिकारी मोहसीन शेख यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.    जिल्ह्यात अवैधरित्या गौण खनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या उपक्रमाची राज्यस्तरावर दखल घेण्यात आली आहे.   २०२३-२४ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत  तत्कालिन अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांना पुरस्कार प्...

जलसंपदा आपल्या गावात

Image
जलसंपदा आपल्या गावात उपक्रमास प्रारंभ  - जल व्यवस्थापन कृती पंधरवाडानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये जलसंपदा कृती व्यवस्थापन घरोघरी पोहोचविण्यासाठी 'जलसंपदा आपल्या गावी' उपक्रमास सुरूवात करण्यात आली. श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथे आमदार विक्रम पाचपुते यांच्या उपस्थितीत या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, जलसंपदा विभाग समन्वयक राजेंद्र कासार, वाघाड प्रकल्पाचे समन्वयक हनुमंत देशमुख उपस्थित होते.    पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरज असल्याचे सांगत आमदार विक्रम पाचपुते म्हणाले, अनधिकृत उपसा बंद करण्याबरोबरच लाभक्षेत्रातील पिकांना प्रथम प्राधान्याने पाणी उपलब्ध करून देण्यात यावे. आवर्तन कालावधीमध्ये कालव्यातून होणारी पाणी गळती थांबविण्यासाठी विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली.  राजेंद्र कासार म्हणाले, नियमितपणे चालणाऱ्या पाणी वापर  संस्थांना ५० ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा मिळू शकतो. या परताव्यातून  पाणी वापर संस्था आपल्या लाभक्षेत्रातील कालवे, चाऱ्यांची  दुरुस्ती कर...

महात्मा फुले विद्यापीठाचा पदवी प्रदान समारंभ लवकरच

Image
बेक्रींग  महात्मा फुले कृषि विद्यापीठ चा 38 वा पदवी प्रदान समारंभ मंगळवारी 22 एप्रिल 2025  होणार  यावेळी महामहिम राज्यपाल पी सी राधाकृष्णन, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, कृषि मंत्री माणिकराव कोकाटे, राज्यमंत्रि आशिष जयस्वाल  कुलगुरु डॉ शरद गडाख आदी सह कार्यकारी सदस्य उपस्थित राहणार असल्याचे कुलसचिव नितीन दानवले यांनी माहीती दिली आहे

जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात निमित्त कर्मचारी प्रशिक्षण

Image
जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' निमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबीर संपन्न    - जलसाक्षरता वाढीसाठी आयोजित ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ निमित्ताने जलसंपदा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले.   अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी व राहुरी तालुक्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांसाठी  स्व. यशवंतराव चव्हाण सभागृह, अहिल्यानगर येथे शिबीर संपन्न झाले. संगमनेर, राहाता, कोपरगाव, श्रीरामपूर व अकोले तालुक्यासाठीचे प्रशिक्षण मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे तर  श्रीगोंदा, पारनेर, कर्जत व जामखेड तालुक्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कुकडी वितरण बांधकाम विभाग कोळवाडी या ठिकाणी संपन्न झाले.  प्रशिक्षण शिबीरामध्ये महेश लांजेकर यांनी ई-ऑफीस प्रणालीबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.  ई-बिलिंगबाबत  राजन लेंगडे यांनी तर 'गुणवत्ता नियंत्रण' या विषयावर निवेदिता वाणी यांनी प्रशिक्षण दिले.  यावेळी अधीक्षक अभियंता बी.के. शेट्ये, कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, स्वप्नील काळे, कैलास ठाकरे, प्रवीण घोरपडे आदी उपस्थित हो...

पाण्याचा विवेकी वापरासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे- जिल्हाधिकारी डाॅ पंकज आशिया

Image
पाण्याच्या  विवेकी वापरासाठी सामूहिक प्रयत्न गरजेचे -डॉ.पंकज आशिया  जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात कृषी विभागाने पाणी वापर संस्थांसोबत समन्वय साधून पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक पद्धतीत बदल घडवून आणण्यावर भर द्यावा आणि सर्व विभागांनी मिळून पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी केले.    नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान आयोजित जलव्यवस्थापन कृती पंधरवडाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेट्ये, संतोष सांगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसमुद्रे आदी उपस्थित होते.    जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमात सर्व शासकीय विभागांचा सहभाग अपेक्षित आहे. सर्वांनी समन्वयाच्या माध्यमातून उद्दिष्टानुसार कार्यक्रमाचे योग्य व्यवस्थापन करावे. त...

जलव्यवस्थापन पंधरवडा आयोजन

Image
जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल दरम्यान 'जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' चे आयोजन   नागरिकांना पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देण्याबरोबरच जलसाक्षरता वाढीसाठी जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान जलव्यवस्थापन कृती पंधरवडा' चे आयोजन करण्यात आले  असून त्या अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा विभागामार्फत देण्यात आली आहे. जलसंपदा पंधरवडा शुभारंभ १५ एप्रिल २०२५ रोजी करण्यात येईल.  १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी,कर्मचारी यांचे प्रशिक्षण व  ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण, १८ एप्रिल रोजी  शेतकरी,पाणी वापर संस्था संवाद, १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी आणि २० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान रबविण्यात येणार आहे.  उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींचे २१ एप्रिल रोजी  निरसन करण्यात येणार आहे. २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे, २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फ...

दुकानावर घुसले कंनटेर

Image
दुकानावर कंनटेर घुसले वाचले अनेकांचे प्राण  नेमक घडल काय @ पत्रकार शिवाजी घाडगे  एखादा कंनटेर एखाद्या दुकानावर  वहाने तुडवत वेगाने घुसतो तेव्हा नेमकी तिथली परिस्थिती कती भयानक असेल यांची कल्पना न केलेली बरी   महाविर जंयती मुळे प्रयाग बंद होते  प्रयाग म्हणजे 'बार'  कदाचित तो जेव्हा सुरु असतो तेव्हा ग्रांहक मोठ्या प्रमाणावर असतात कारण चौफुलीवर व महामार्गावरील हे प्रयाग तसे प्रयागचा मालक हा एक अतिशय मित भाषी भला माणुस मात्र दुकानावर आता मुल असतात  आपघात प्रयागचे मोठे नुकसान झाले आहे  सकाळी येथेच गाईच्या दुधाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते म्हणजे येथे दुध ही विकले जाते व मद्य ही  कन्टेनर ने काही वहाने उडवली तसेच हे प्रयाग ही मात्र कोणतीही जिवीत हानी यावेळेस झाली नसली तरी भविष्यात होऊ नये म्हणुन काळजी घेणे गरजेचे अशी काळजी घेणे गरजेचे आहे  प्रयाग चे मोठे नुकसान आघातात झाल्याने दुसर्‍या दिवशी प्रयाग कडे आलेले पावले आपसूकच माघारी फिरले मात्र गुरुवारी भगवान महावीर जंयती असल्याने अनेक जण वाचले ही चर्चा दुसर्‍या दिवशी सुरुच होती...