Posts

श्रीरामपूरात गोळी बारात बंटी जहागीरदार ठार

Image
बंटी जहागीरदार यांची गोळ्या  झाडून हत्या हल्लेखोर पसार राहुरी  श्रीरामपूरात  बुधवारी  गोळीबाराचा थरार झाला असून दुपारी अडीच्या  सुमारास कब्रस्तानातील एक अंत्यविधी आटोपून परतणारे बंटी जहागीरदार यांच्यावर सेंट्लुक हॉस्पिटलच्या  गेट समोर थांबलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केला.या गोळीबारामध्ये ते  मरण पावले  कब्रस्तानातील अंत्यविधी आटोपून बंटी जहागीरदार हे आपले मित्र अमीन हाजी याच्या बाईकवर मागे बसून घरी परत चालले होते.संत लूक हॉस्पिटलच्या ओपीडीच्या गेट जवळ ते आले असता आधीपासून तेथे उभे असलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एकाने त्यांना मागून दगड मारला.दगड लागल्याने ते मागच्या मागे गाडी वरून उतरले व त्यांनी तो दगड परत त्या हल्लेखोरावर भिरकावला. त्याक्षणी हल्लेखोरांनी त्यांच्याजवळ असलेल्या पिस्तूल मधून बंटी जहागीरदार यांच्यावर गोळीबार केला. त्यांच्या पोटात, पायाला तसेच मागून पाठीवर सुद्धा गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.यानंतर ते खाली कोसळले.त्याचवेळी मागून येणाऱ्या अनेक लोकांनी त्यांना उचलून कामगार हॉस्पिटलमध्ये दाखल केले. ते...

आब्या च्या भुरी रोग नियंत्रणावर सल्ला

Image
आंबा भुरी रोगाबाबत शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा सल्ला राहुरी                  डिसेंबर व जानेवारी महिन्यात आंबा पिकाला मोहोर येण्यास सुरुवात होताच आंबा भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो असा इशारा राहुरी कृषी विद्यापीठातील वनस्पती रोगशास्त्र व अनुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रवींद्र गायकवाड, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. संजय कोळसे व डॉ. प्रवीण खैरे यांनी दिला आहे. या कालावधीत हवामान ढगाळ राहणे, रात्रीचे तापमान दिवसाच्या तुलनेत कमी असणे व दिवसा २० ते २५ अंश सेल्सिअस तापमान असल्यास भुरी रोग झपाट्याने पसरल्याचे आढळून येते.          हा रोग ओयडियम मॅन्जीफेरी या बुरशीमुळे होतो. या बुरशीची बीजे वाऱ्यामार्फत पसरत असून मोहोर व कोवळ्या पालवीवर प्रथम लागण दिसून येते. सुरुवातीला मोहोराच्या दांड्याच्या टोकाजवळ पांढऱ्या रंगाची तंतूमय बुरशी दिसते व पुढे संपूर्ण मोहोरावर तिचा प्रसार होतो. बुरशी पेशीतील अन्नरस शोषून घेत असल्याने मोहोराची वाढ खुंटते. रोग तीव्र झाल्यास ७० ते ८० टक्के ...

एक आदानी बाकी आडानी

Image
एक अदानी, बाकी आडाणी भाष्य घाडगे न्यूज @शिवाजी घाडगे  उद्योग क्षेत्रातील नामवंत गौतम अदानी अलिकडेच बारामतीत येऊन गेले आणि खासदार सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार असल्याच्या बातम्या पेरल्या गेल्या. मागे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येऊन गेले होते. मग तेव्हाच खासदार सुप्रिया सुळे मंत्रिमंडळात गेल्या असत्या. मुळात लोकसभा निवडणुकीत खासदार शरद पवार यांनी अतिशय बिकट परिस्थितीत आघाडीचे खासदार निवडून आणले. अनेक जण खासदार होऊन गेले. मुळात उद्योग येत-जात असतात; याचा थेट संबंध मंत्रिमंडळात स्थान मिळण्याशी जोडणे कसे शक्य आहे? तसे राजकारणात अशक्य असे काही नसते. तसे खासदार सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तर ते चांगलेच. कारण खासदार निलेश लंके काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यांचे छायाचित्र सोशल मीडियावर झळकले व काढले गेले. त्या छायाचित्रात खासदार सुप्रिया सुळे देखील हसताना दिसत होत्या. खा. शरद पवार… भल्याभल्यांना न उलगडणारं कोडं…  त्याच्या पुढे ए आय तंत्रज्ञान कदाचित फिके पडेल  कारण उद्योगपती गौतम अदानी बारामतीत आले आणि भल्याभल्यांची नीती ग...

सत्कार पडत्या काळात मदत करणाऱ्यां हाताचा !

Image
सत्कार मदत करणाऱ्या हातांचा   साथ ॥ घाडगे न्यूज  आपल्या यशस्वी जीवनप्रवासात, विशेषतः जीवनाच्या खडतर काळात साथ देणाऱ्या, मदत व सहकार्य करणाऱ्या व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक दिमाखदार स्नेहसत्कार सोहळा संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आला होता. हा सोहळा पूर्वी श्रमिक व्यावसायिक आणि सध्या हरिभक्त पारायण कीर्तनकार असलेले राजेंद्र धनराज चोरडिया यांनी आयोजित केला होता. या सोहळ्यास अगदी मोजकेच स्नेहजन उपस्थित होते. हुरडा, मिष्टान्न भोजन व स्नेहसत्कार  नातेवाईकांपासून ते समाजातील अनेक घटक असे असतात की, ज्यांनी आयुष्यात मोठे सहकार्य केलेले असते; मात्र त्यांचे साधे आभारही कधी व्यक्त केले जात नाहीत. मात्र राजेंद्र चोरडिया यांनी आपल्या उद्योग-व्यवसायात मदत व सहकार्य करणाऱ्या सर्व कष्टकरी घटकांचा स्नेहसत्कार करून एक वेगळाच आदर्श घालून दिला. ऊसतोडणी कामगार, टोळी मुकादम, अधिकारी, ट्रक चालक, फिटर, कीर्तनकार अशा सर्वांचा त्यांनी सन्मान करून मनापासून आभार मानले. “मी आज जे काही आहे, ते तुमच्या मदतीमुळे आणि सहकार्यामुळे आहे,” अशी भावना व्यक्त करत त्यांनी आपल्या जी...

दादा जरा दमान पाय काढू नका पायावर उभे करा

Image
दादा, जरा दम्यानं… पाय काढू नका, लोकांना पायावर उभं करा भाष्य घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  देवळाली प्रवरा नगरपालिकेत पुन्हा एकदा नगराध्यक्ष म्हणून सत्यजित कदम यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे. मात्र विजयानंतर झालेल्या आभार सभेत “पाय काढण्याची” भाषा वापरणे योग्य नाही, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आपल्या पदाचा आणि पक्षाचा उपयोग लोकांना पायावर उभे करण्यासाठी व्हायला हवा. कारण तुमचे पाय खेचण्याचे प्रयत्न करणारे लोक तुमच्या पक्षातही आहेत, हे वास्तव आहे. सलग दुसऱ्यांदा नगराध्यक्ष होणारे तुम्ही देवळाली प्रवराचे पहिलेच नगराध्यक्ष आहात. तुमचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हेही अवघ्या एका मताने नगराध्यक्ष झाले होते आणि पुढे राहुरीचे आमदार बनले. कदाचित तुम्हीही भविष्यात आमदार व्हाल, मात्र सध्या तरी दादा, जरा दम्यानं वागण्याची गरज आहे. तसे पाहिले तर नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यासाठी ही निवडणूक वैयक्तिकदृष्ट्या फारशी अवघड नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अप्रत्यक्ष मदत मिळाल्याचे बोलले जाते. शिवाय केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने “देवळालीत पुन्हा भाजपलाच सत्...

भाजपा होतोय का आया राम गया राम पक्ष?

Image
भाजप होत आहे ‘आया राम–गया राम’ पक्ष? चर्चा घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे  भाजपमध्ये ‘आया राम–गया राम’ संस्कृती वाढत असल्याचा आरोप आता उघडपणे होऊ लागला आहे. याबाबत अलिकडेच माजी मंत्री व आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आवाज उठवला. कोणतीही तमा न बाळगता त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड विरोध दर्शवला. याआधी पक्षातील ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री पंकजा मुंडे तसेच “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे,” तसेच विनोद तावडे यांनाही अशाच प्रकारची वागणूक मिळाल्याचे जनतेसमोर आले आहे. दरम्यान, गुरुवारी नाशिकमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेशाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या, स्वतःला  सर्वात मोठा पक्ष म्हणवणाऱ्या भाजपमध्ये असे बेशिस्त वातावरण निर्माण होईल, असे कुणालाही वाटले नव्हते. तपोवन येथील वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून आधीच तापलेले नाशिक, आता भाजपमध्ये होत असलेल्या पक्षप्रवेशांमुळे अधिकच तापले आहे. साधु नाशकात येण्या आधीच राजकीय सधी साधुनी संधी साधली.  माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ आयोजित कार्य...

कोपरगावात आक्का च्या नावावर तिकीट फाडत संधान साधले

Image
कोपरगावात ‘आक्का’च्या नावावर तिकीट फाडत संधान साधले घाडगे न्यूज |@ शिवाजी घाडगे कोपरगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या  निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत पाहायला होऊन . या चुरशीच्या लढतीत भाजपाने अवघ्या ४०९ मतांनी राष्ट्रवादीला पराभूत करत नगराध्यक्ष पदांवर संधान साधले.  ही निवडणूक आमदार आशुतोष काळे आणि  चेअरमन विवेक कोल्हे यांच्यातील राजकीय वर्चस्व सिद्ध करण्या साठी लढली गेली अखेर विवेक कोल्हे यांनी आपले उमेदवार पराग संधान यांना नगराध्यक्ष पदावर बसवून करत कोपरगाव शहरावरील आपले राजकीय वर्चस्व सिद्ध केले आहे.  भाजपाचे उमेदवार पराग संधान यांना १८ हजार ५०३ मते मिळवून विजयी पताका फडकवली, तर राष्ट्रवादीचे ओमप्रकाश उर्फ काका कोयटे यांना १८ हजार ०९४ मते मिळाली. नगरसेवक निवडणुकीत भाजपाला १९, तर राष्ट्रवादीला ११ जागा मिळाल्या. अवघ्या ४०९ मतानी पराग संधान यांचा विजय झाला.  विशेष बाब म्हणजे, ओमप्रकाश कोयटे हे कोल्हे गटाशी संबंधित असतानाही ‘आक्का’च्या नावाने तिकीट फाडत त्यांना राजकीय कोंडीत पकडण्यात कोल्हे गट यश...