Posts

फ्रान्स मध्ये कौशल्य स्पर्धा

Image
फ्रान्समध्ये  जागतिक कौशल्य स्पर्धा  जायचय मग करा अर्ज   जागतिक कौशल्य स्पर्धा सन २०२४ मध्ये फ्रांस (ल्योन) येथे होणार असून त्यात सहभाग नोंदविण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशस्तरावर स्पर्धा घेतली जाणार आहे. याद्वारे गुणवान कौशल्यधारक पात्र स्पर्धकांचे नामांकन करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील युवक-युवतींनी महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी. असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त निशांत सुर्यवंशी यांनी केले आहे.  ही स्पर्धा दर दोन वर्षांनी होते आणि ही जगातील सर्वांत मोठी व्यवसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा असून जगभरातील २३ वर्षाखालील तरूणांसाठी त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलपिंक खेळासारखीच आहे. या स्पर्धेमध्ये भारतातील प्रतिभासंपन्न व कुशल उमेदवारांचे नामांकन करण्याच्या दृष्टीने ठाणे जिल्ह्यातील युवक-युवतींनी विविध ५२ क्षेत्रामध्ये होणाऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी https://kaushalya.mahaswayam.gov.in/ या महास्वयंम वेबपोर्टलवर नोंदणी करावी. ...

आदीवासी बाधवांना कृषी औजारे

Image
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि किटकशास्त्र विभागाच्या अखिल भारतीय सूत्रकृमी संशोधन योजनेमार्फत आदिवासी उपयोजनेतून पळसून, ता. नवापूर, जि. नंदुबार येथे सायकल कोळपे, ट्रायकोडर्मा प्लस-जैविक किडनाशक व कृषिदर्शनी या कृषि निविष्ठांचे मोफत वाटप आदिवासी शेतकरी बाधवांना करण्यात आले. सदर कार्यक्रम भारतीय कृषि संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी अदिवासी उपयोजनेसाठी मंजुर केलेल्या विशेष निधीतून विस्तार शिक्षण संचालक व किटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी.एस. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात आला. या प्रसंगी शेतकर्यांना विविध पिकांवर होणार्या सुत्रकृमींच्या प्रभावी नियंत्रणाबाबतचे मार्गदर्शन किटकशास्त्र विभागांतर्गत असलेल्या अखिल भारतीय समन्वित सुत्रकृमी संशोधन योजनेतील सहाय्यक सूत्रकृमी शास्त्रज्ञ डॉ. पल्लवी पाळंदे यांनी केले. या कार्यक्रमाला संशोधन सहयोगी  विनोद पवार,  हरिचंद्र भुसारी, पळसून गावचे सरपंच, उपसरपंच व आदिवासी शेतकरी बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. सरपंच श्री. संतोष कोकणी यांनी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, अ.भा.स. सुत्रकृमी संशोधन योजना व...

मुख्यमंत्र्यांसमवेत विठुरायाचा शासकीय पुजेचा मान काळे दाम्पत्यला

Image
श्रीक्षेत्र पंढरपुर येथील आषाढी एकादशीनिमित्ताने मुख्यमंत्र्यांसमवेत पांडुरंगाची पुजा करण्याचा यंदाचा मान नेवासा येथील भाविकाला  यंदा अहमदनगर जिल्ह्यातील वाकडी (ता. नेवासा) येथील भाऊसाहेब मोहनीराज काळे त्यांच्या सुविध्द पत्नी मंगल  या शेतकरी दाम्पत्यास मानाचा वारकरी प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत महापूजेचा मान मिळाला.  काळे दाम्पत्य गेल्या २५ वर्षांपासून महंत भास्करगिरी महाराजांसोबत देवगड ते पंढरपूर पायी वारी करतात.   महापूजेनंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा आणि मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून मानाच्या वारकरी दाम्पत्याला दिला जाणारा मोफत वार्षिक बस प्रवास पास मुख्यमंत्री  शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला.

आय व्ही तंत्रज्ञान गिर कालवड जन्माला

Image
आय. व्ही. एफ तंत्रज्ञानातून झाला सहाव्या गिर कालवडीचा जन्म देशी गायींच्या उच्च वंशावळीचे जलदगतीने संवर्धनासाठी आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानाचा शेतकर्‍यांनी  वापर करावा - अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे आय.व्ही.एफ. तंत्रज्ञानांचा जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी फायदा घेऊन आपल्या गोठयामध्ये उच्च वंशावळीच्या देशी गायी निर्माण कराव्यात असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी केले. राहुरीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र, पुणे येथे कार्यरत आहे. या केंद्रामार्फत उच्च वंशावळीच्या देशी गायींच्या संवर्धनासाठी आय.व्ही.एफ./भृण प्रत्यारोपणाचा कार्यक्रम विद्यापीठाचे  प्रक्षेत्र व शेतकर्‍यांच्या गोठयात राबविण्याचे काम सुरु आहे. राहुरीच्या गो संशोधन प्रकल्पावर या तंत्रज्ञानाने आजपर्यंत 6 गिर व 9 साहिवाल या देशी जातीच्या उच्च वंशावळीच्या कालवडी जन्माला आलेल्या आहेत. नुकत्याच जन्मलेल्या सहाव्या गिर कालवडीची पाहणी करताना अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे बोलत होते. य...

प्रसाद नगर येथील नागरिकांना शासनाने मोफत घरे द्यावी

Image
प्रहार ची मागणी प्रसाद नगर येथील गरजुना शासन मार्फत मोफत घरे द्या  प्रसादनगरच्या बंद दगडखान जागेची शासनाकडून पाहणी.  प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ क्षेत्राचे प्रमुख आप्पासाहेब ढूस यांचे मागणीरून देवळाली प्रवरा हद्दीत प्रसादनगर भागात असलेल्या बंद दगडखान जागेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना राबवून तेथील बेघर कुटुंबांना मोफत घरे उपलब्ध करून देवू असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा नामदार बच्चुभाऊ कडू यांनी नागपूर येथे नुकतेच केले होते.  त्यानुसार प्रहार चे जिल्हा प्रमुख अभिजीत पोटे यांचे  सहकार्याने शासन पातळीवर सुरू असलेल्या पाठपुराव्यामुळे नगरच्या जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ  यांचे आदेशाने राहुरी येथील मंडलाधिकारी यांनी अलिकडेच प्रसादनगर येथील बंद दगडखान जागेची पाहणी केली.       नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र विधान मंडळाच्या दिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने कच्च्या मातीच्या पाल घरामधील भटक्या विमुक्त जाती जमती नागरिकांना घरे मिळावीत म्हणून आ. बच्चुभाऊ कडू यांनी उभारलेल्या आंदोलन प्रसं...

पावसाने नुकसान झालेल्या पिकांना नुकसान भरपाई मिळावी-प्रहार

Image
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना अतिवृष्टीप्रमाणे अनुदान द्या - सुरेशराव लांबे  राज्य सरकारने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट अनुदान अतिवृष्टी बाधीत शेतकऱ्यांना मदत म्हणून जाहीर केल्याप्रमाणे अनुदान दिले. त्याच प्रमाणे सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान शेतक-यांना त्वरित देण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेश लांबे यांनी नायब तहसीलदार संध्या दळवी यांना निवेदन देत केली आहे.  निवेदनात म्हटले आहे की, गेल्या वर्षी महाराष्ट्रासह राहुरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. परंतु तालुक्यातील सात मंडळापैकी राहुरी या एकाच मंडळाला अतिवृष्टीच्या निकाषाप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यातही या मंडळातील अनेक शेतकर्यांचे अनुदान अजुनही खात्यावर जमा झालेले नाही. १३ जुन २०२३ रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाने सततच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे अनुदान जाहीर केले. परंतु शासनाने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट अनुदान जाहीर केलेल्या धोरणात बदल करून पुन्हा शासनाच्या वन व महसूल विभाग...

महिलेने केले समर्थ बाबुराव पाटील दिंडीचे चे सारथ्य

Image
देवळाली प्रवरा येथील  समर्थ बाबुराव पाटील महाराज दिंडीच्या रथाचे सारथ्य केले  मनीषा ढोकचौळे यांनी.  आता यांत्रिकीकरण मुळे शेतीतील कामाला वेग आला आहे मात्र पंढरपूर विठू भेटीला निघालेल्या रथाचे टॅक्टर चक्क महिलेने चालवल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या  समर्थ बाबुराव पाटील दिंडीचे हे तेरावे वर्ष आहे माजी सनदी अधिकारी दत्तात्रय कडु पाटील यांनी गेल्या 12 वर्षांपासून पंढरपूर पायी दिंडी सुरु केली आहे आता दिंडी पंढरपूर नजीक पोहचली आहे