नगराध्यक्ष खुर्ची साठी आमने सामने कुरघुड्याचा खेळ रंगला

सत्ये साठी आमने सामने 
  कुरघुड्याचा खेळ रंगला....!
               घाडगे न्यूज 
   स्पेशल रिपोर्ट @शिवाजी घाडगे 
    अहिल्यानगर जिल्हातील 10  नगरपालिका तसेच 2 नगरपंचायत 
निवडणूकी साठी मंगळवारी 2 नोव्हेंबर 2025  रोजी मतदान होणार असून 
महायुतीचे सत्ता धारी पक्ष आमने सामने तर सत्ते साठी राजकीय कुरघुड्याचा खेळ रंगला आहे 
नगराध्यक्षपद हे थेट जनतेतुन असल्याने अती महत्व प्राप्त झाल्याने तसेच आपलेच नगरसेवक कसे जास्त नगसेवक निवडुन येणार या साठी सगळेच सरावले आहेत. 
नगर अध्यक्ष पदा च्या प्रमुख लढती कोठे सरळ दुरंगी तर कोठे चौरंगी 
राष्ट्रवादी दोन व शिवसेना दोन झाल्या असून 
राज्यात युती असली तरी भाजपा, राष्ट्रवादी,   शिवसेना शिंदे यांनी आप आपल्या पक्षाचे चिन्ह मतदारा समोर आणले आहेत. 
उत्तर नगर जिल्ह्यात श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, शिर्डीत काॅगेसचा पंजा असून संगमनेर अजून ही विधानसंभा पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले  दिसत नाही 
शिवसेना शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह असले तरी शिवसेना उबाठाची मरगळ जायला तयार नाही  पक्षाची उमेदवारी  नामनिर्देशनपत्र अवैध ठरवल्याने इच्छुक उमेदवार न्यायालयात गेले तरी 
खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी 
मोबाईल करुन चौकशी करण्याची तसदी घेतली नाही. 
  राहुरीत विधानसंभा पोट निवडणूक होणार असल्याने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नमती भुमिका घेत जुळवून घेत तर देवळालीत भाजपाचे कमळ फुलवण्या साठी सत्यजित कदम याचा आत्मविश्‍वास सत्ते मार्ग सुखकर करण्या साठी एकाकी लडत देथ आहे. 
  कोपरगाव येथे विद्यमान आमदार अशुतोष काळे व चेअरमन विवेक कोल्हे यांच्या प्रतिष्ठेबरोरच दोन माजी नगराध्यक्ष येथे सत्ते साठी झुंज देत आहेत .
 सोमवारी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येत आहेत तर संगमनेर मध्ये गेले अनेक वार्षा पासून चा काॅगेसचा हात मोठ्या दिमाखात उचावंत होता यावेळी 
मात्र येथे दिसत नाही दोन विद्यमान आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे येथे ही आमदार सत्यजित याच्या मैथलीचे अनेक भाषावर प्रभुत्व आहे मतदारांवर प्रभुत्व दाखवणार की खताळाच्या सुर्वणा यांना सुर्वण काळ येणार. 
श्रीरामपूर पालिकेत करण ससाणे आपले वडील दिवंगत आमदार जंयत ससाणे यांचे किड्रेट कार्ड वापरत असुन आमदार हेमंत ओगले यांची त्यांना मनापासून साथ असली तरी माजी आमदार भानुदास मुरकुटे व माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी प्रकाश चित्ते यांच्या धनुष्यबाण ताकत दिली आहे तर माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक भाजपाला साथ देत असल्या तरी निवडणूक तोडावर साव करी गुन्हाही वातवरण ढवळून निघाले आहे त्यामुळंच भाजपाची फॅचशी निवडनुकी आधी गाजली 
देवळाली प्रवरात विद्यमान नगराध्यक्ष भाजपाचे सत्यजित कदम याच्या पुढे काॅगेसचे 
कृष्णा मुसमाडे व शिवसेनेचे बाबासाहेब मुसमाडे यांनी अवाहन उभे ठाकले असून येथे धनुष्यबाण कमळाला निशाना साधतो का  हाताला  बळकटी यावर सत्यजित यांचा सत्तेचा मार्ग ठरणार आहे. 
राहुरीत आघाडीचे भाऊसाहेब मोरे व भाजपाचे सुनिल मोरे यांची सरळ लढत असून राजकीय बाह्य हस्तक्षेप वाढला आहे. 
राहात्यात दोन गाडेकर यांच्यात लढत असून शिर्डी व नेवासा नगरपंचायत एकतर्फी वर्चस्व सिद्ध करीता सरावले 
तर पार्थडीत भाजपा बरोबर दोन राष्ट्रवादी लढत असून 
जामखेड मध्ये दोन राष्ट्रवादी व काँग्रेस लढत असून 
स्थानिक पातळीवर राजकीय वातावरण ढवळून निघाले असून ही निवडणूक नेत्यांबरोबर कार्यकर्ता साठी प्रतिष्ठेची होणार 
    नगराध्यक्षपदा करीता 102 उमेदवार  तर नगसेवक पदा करीत 1274 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत 
      कोपरगाव नगरपालिका 
  नगराध्यक्ष पदा साठी प्रमुख लढत
    काका कोयटे-राष्ट्रवादी 
    पराग संधान-भाजपा 
    राजेंद्र झावरे- शिवसेना 
    विजय वाहडणे-अपक्ष 

 देवळाली प्रवरा नगर पालिका 
   सत्यजित कदम- भाजपा 
 बाबासाहेब मुसमाडे-शिवसेना शिंदे
   कृष्णा मुसमाडे-काॅग्रेस 
    प्रसाद सागळे- वंचित 
     
राहुरी नगर पालिका 
     समोरा समोर सरळ लढत 
    सुनिल पवार-भाजपा 
   भाऊसाहेब मोरे- आघाडी 

राहाता नगर पालिका 
     धनजय गाडेकर- आघाडी 
    स्वाधीन गाडेकर-  भाजपा 
 
संगमनेर नगर पालिका 
 समोरा समोर सरळ 
   मैथिली तांबे- विकास समिती 
   सुर्वणा खताळ - शिवसेना शिंदे 

श्रीरामपूर नगर पालिका 
     करण ससाणे- काॅगेस 
    प्रकाश चित्ते -  शिवसेना शिंदे 
    श्रीनिवास बिहाणी- भाजपा 
   अशोक थोरे  - शिवसेना उबाठा 
  
   श्रीगोंदा नगर पालिका 
     सुनिता खेतमाळीस-भाजपा 
     शुभांगी पोटे- शिवसेना 
    ज्योती खेडकर - राष्ट्रवादी 
   गौरी भोस- राष्ट्रवादी श प

     जामखेड नगर पालिका 
संध्या राळेभात -काॅगेस 
पायल बाफना- शिवसेना 
प्राजल चिंतामणी-राष्ट्रवादी श प
सुर्वणा निमोणकर- राष्ट्रवादी 

शेवगाव नगर पालिका 
रत्नमाला फलके-भाजपा 
माया मुंडे - शिवसेना 
विद्या लांडे -राष्ट्रवादी 
परविण काझी- राष्ट्रवादी श प 

पार्थडी नगर पालिका 
अभय अव्हाड-भाजपा 
संजय भागवत- राष्ट्रवादी 
बंडू बोरुडे- राष्ट्रवादी श प 
निगेश लोटके - अपक्ष

शिर्डी नगरपंचायत 
 जयश्री थोरात- भाजपा 
माधुरी शेजवळ-काॅगेस 
भाग्यश्री सावकारे  -शिवसेना 
कल्याणी आरणे-अपक्ष 

नेवासा नगरपंचायत 
अल्ताफ पठाण- काॅगेस 
सचिन कडू- राष्ट्रवादी 
करणसिह घुले-शिवसेना 
नंदकुमार पाटील- राष्ट्रवादी श प








Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर