Posts

सहेवाल गाय प्रकल्प विद्यापीठात

Image
कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाय संवर्धन प्रकल्प मंजूर भारतीय कृषि संशोधन संस्था, नवी दिल्ली अंतर्गत कार्यरत असलेल्या उत्तर प्रदेशमधील मेरठ येथील केंद्रीय गाय संशोधन संस्थेतर्फे महात्मा फुले कृषि विद्यापीठ अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, पुणे येथे साहिवाल गाईंचे संवर्धनाकरीता संशोधनासाठी माहिती संकलन केंद्र (डेटा रेकॉर्डिंग युनिट) मंजूर झाले आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यांनी दिली. या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या साहिवाल गाईंच्या अनुवंशिक क्षमतेचे संवर्धन, प्रसार व अनुवंशिक सुधारणा करणे हा आहे. देशातील दुधासाठी प्रसिद्ध असलेल्या देशी साहिवाल गायीचे संवर्धन करण्यास या केंद्राचे माध्यमातून प्रोत्साहन मिळेल व त्यामुळे महाराष्ट्रामध्ये देशी गाईंचे दूध उत्पादन वाढीस हातभार लागेल असे ते म्हणाले. भारत व पाकिस्तानच्या सीमावर्ती भागातील पंजाब प्रांतातील साहिवाल जिल्हा हे साहिवाल गायींचे उगमस्थान. या गाई लंबी बार, लोला, मॉन्टगोमेरी, मुलतानी आणि तेली अशा नावांनी देखील ओळखल्या जातात. अत्यंत शांत...

तनपुरे कारखान्यांच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने घेतली फासी

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  तनपुरे साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने परिस्थितीला कटाळु फासी घेतली दत्तात्रय शेलार असे मयताचे नाव असून संध्या ते कामगार वसाहती मध्ये राहत होते   सेवानिवृत्त नंतर   जिवन जगने मुश्किल झाल्याने शेलार यांनी तांभेरे येथे शुक्रवारी दुपार नंतर   आपल्या शेतात जाऊन गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपवली  शेलार याच्या जाण्याने शोकाकुल वातावरणात झाले 

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  बिबट्याने घेतला दिवसा ढवळ्या  बालिकेचा नरट्याचा घोट  जंगलातला बिबट्या घरासमोर आला व चार वर्षांच्या मुलीला भक्ष्य केल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वरवंडीत शोककळा पसरली आहे  गुरुवारी सकाळी  वेदिका श्रीकांत ढगे अंगणात खेळत होती. गिन्नी गवतात  दबा धरून बसलेला बिबट्याने अचानक वेदिकावर झडप मारली हल्ला करून जखमी केले वेदिकेला नगर येथे उपचारा साठी दाखल केले तेथेच डाॅक्टरानी तीला मृत घोषित केले  वन विभाचे कर्मचारी घटना स्थळी रवाना झाले असुन बलिकेचा जिव बिबट्याने घेतल्याने भितीदायक वातावरण निर्माण झाले असून  ग्रामीण भागातील जनतेला शासनाने शस्त्र द्यायला हवेत 

चला कांदे बियाणे खरेदीला विद्यापीठात

Image
कांद्याचे बियाणे खरेदी साठी चला विद्यापीठात  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या उपस्थितीमध्ये कृषि विद्यापीठातील बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या कांदा बियाण्याची विक्री सुरू करण्यात आली. यावेळी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, अधिष्ठाता तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. श्रीमंत रणपिसे, कुलसचिव अरुण आनंदकर, नियंत्रक  सदाशिव पाटील, पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विठ्ठल शिर्के, निम्नस्तर कृषि शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता  डॉ. साताप्पा खरबडे  उपस्थित होते. याप्रसंगी प्रातिनिधिक स्वरूपात मान्यवरांच्या हस्ते मुक्काम पोस्ट दुगाव, तालुका चांदवड, जिल्हा नाशिक येथील हिरामण मंडलिक व राहुरी तालुक्यातील ताहराबाद येथील श्रीमती मंदाकिनी औटी यांना मान्यवरांच्या हस्ते कांदा बियाणे देऊन विक्री सुरू करण्यात आली. यावेळी बियाणे खरेदीसाठी आलेल्या शेतकर्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था बियाणे विभागाच्या वतीने करण्यात आलेली आहे. यावेळी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मास...

देवळाली प्रवराचे माजी नगराध्यक्ष कदम याच्या घरा समोर बिबट्या

Image
बेक्रीग @पत्रकार शिवाजी घाडगे  माजी नगराध्यक्ष कदम याच्या घरावर बिबट्याची डरकाळी देवळाली प्रवरा येथे शनिवारी मध्यरात्री घडलेली घटना घटना  माजी नगराध्यक्ष मुरलीधर कदम याच्या घरा समोर बिबट्याने डरकाळी फोडल्याचे सी सी टिव्ही कॅमेर्‍यात कैद झाले खरे मात्र वनविभाग या बिबट्याला पिंजऱ्यात कैद करणार का असा सवाल परिसरातील नागरिक करीत आहेत  बिबट्याच्या वावराने घबराट पसरली आहे 

शिर्डी लोकसभेसाठी 22 नामनिर्देशन

Image
शिर्डी लोकसभा मतदारसंघात २२  नामनिर्देशन अर्ज वैध                      शिर्डी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी, २६ एप्रिल २०२४ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. यात ३१ उमेदवारांपैकी २२ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज वैध ठरले तर ९ उमेदवारांचे नामनिर्देशन अर्ज नाकारण्यात आले नामनिर्देशन अर्ज वैध ठरलेल्या २२ उमेदवार -भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना - उध्दव बाळासाहेब ठाकरे), लोखंडे सदाशिव‌ किसन (शिवसेना), चंद्रकांत संभाजी दोंदे (अपक्ष), अभिजीत अशोकराव पोटे (अपक्ष), भारत संभाजी भोसले (समता पार्टी), नितीन दादाहरी पोळ (बहुजन भारत पार्टी),  बागुल गोरक्ष तान्हाजी (अपक्ष), अॅड. सिध्दार्थ दिपक बोधक (अपक्ष) , अशोक रामचंद्र आल्हाट (जनहित लोकशाही पार्टी), सतिष भिवा पवार (अपक्ष), संजय पोपट भालेराव (अपक्ष), रामचंद्र नामदेव जाधव (बहुजन समाज पार्टी), उत्कर्षा प्रेमानंद रूपवते (वंचित बहुजन आघाडी), गंगाधर राजाराम कदम (अपक्ष), भाऊसाहेब रामनाथ वाकचौरे (अपक्ष) , प्रशांत वसंत निकम (अपक्ष),...

पॅलस्टीक पुर्नवापर करा-कुलगुरु डॉ पी जी पाटील

Image
प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील दिवसेंदिवस प्लॅस्टिकची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. त्याचा परिणाम पर्यावरणाबरोबरच मानवी जीवनावरही होताना दिसत आहे. झालेल्या एका संशोधनानुसार मानवाच्या संपुर्ण आयुष्यात 20 किलोपर्यंत प्लॅस्टिक त्याच्या पोटात जात आहे. या मायक्रोप्लॅस्टिकमुळे कॅन्सर तसेच विविध रोगांमुळे मृत्यूमुखी पडणार्यांची संख्या लाखाच्या घरात आहे. अशा या प्लॅस्टिकला बंदी हा पर्याय नाही तर प्लॅस्टिकचा पुर्नवापर करण्याबरोबरच प्लॅस्टिकला शाश्वत पर्याय शोधावा लागेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात इन्स्टीट्युशन ऑफ इंजिनिअर्स, अहमदनगर लोकल सेंटर, महात्मा फुले कृषि विद्यापीठ व अहमदनगर येथील जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या विद्यमाने वसुंधरा दिवस-2024 चे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची थीम पृथ्वी विरुध्द प्लॅस्टिक ही ...