Posts

जिल्हात बेमोसमीचे तांडव खडकी व वाळकीचे 25 नागरीक सुरक्षीत जागेवर हलविले

Image
खडकी वाळकी परिसरात पूरपरिस्थिती 25 नागरीक हलवले  लष्कराच्या मदतीने आपत्ती निवारण कार्य सुरु  बेमोसमी मुसळधार पावसाने  अविरत पडणाऱ्या  जिल्ह्यातील अहिल्यानगर तालुक्यातील खडकी  व वाळकी गावामध्ये गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. गावामध्ये पाण्याची पातळी कमरेपर्यंत पोहोचली असून, रहिवासी अडकून पडले आहेत. हे गाव सैन्याच्या आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूल (ACC&S) पासून सुमारे २० किमी अंतरावर आहे. याठिकाणी लष्कराच्यावतीने मदतकार्य राबविण्यात येत आहे. यात खडकी येथून १० व वाळकी येथून १५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.  जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्याकडून मदतीची विनंती प्राप्त झाल्यानंतर भारतीय सैन्याने तात्काळ ACC&S येथून एक मदत पथक तैनात करून बचाव व मदत कार्य सुरू केले. हमदत पथक सायंकाळी पथक खडकीनगर गावात दाखल झाले आणि तातडीने बचावकार्य सुरू केले आहे, अशी प्राथमिक माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त झाली आहे.

संभाजीनगर चे आरडीसी लाच घेताना अटक

Image
निवासी उपजिल्हाधिकारी लाच स्विकारताना लाचलुचपत ने रंगेहात पकडले    छत्रपती संभाजीनगरचे निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर  याला लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आरडीसी ने शेतजमिनीच्या कामासाठी 41 लाखांची मागणी केली होती. यातील 5 लाख रुपये घेताना एसीबीने निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना रंगेहाथ ताब्यात घेतले. या कारवाईमुळे  महसुलचे अब्रु वेशीवर आली असून. मससुलची बेकायदेशीर वसुली करणाऱ्याला तक्रार दाराने चांगलाच धडा दिला आहे. 

कृषी संकल्प अभियान

Image
राहुरी कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात विकसीत कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आणि अटारी, पुणे अंतर्गत विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात 17 कृषि विज्ञान केंद्राद्वारे दि. 29 मे ते 12 जून, 2025 या कालावधीत विकसित कृषि संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक कृषि विज्ञान केंद्र स्तरावर शास्त्रज्ञांचे दोन चमू तयार करण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ, कृषि विभागातील अधिकारी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि भारतीय कृषि अनुसंधान परिषद, नवी दिल्लीद्वारे संचलित विविध संस्थेचे शास्त्रज्ञ तसेच प्रगतिशील शेतकरी यांचा समावेश असणार आहे. यामध्ये दररोज कृषि विज्ञान केंद्राद्वारे संचलित चमूद्वारे सहा गावांना भेट देण्यात येणार असून एकूण विद्यापीठांतर्गत 1530 गावांना भेटी देण्यात येणार आहेत. या विकसीत कृषि संकल्प अभियानात शेतकर्यांमध्ये जनजागृती केली जाणार असून कृषि क्षेत्रातील प्रगत तंत्रज्ञानासह नव्या पीक वाणांची व योजनांची माहिती शेतकर्यांना दिली जाणार आहे. या माध्यमातून सात लाखाहून अधिक ...

ऑनलाईन विठ्ठल दर्शन बुकींग पास वेळ वाढवली

Image
श्री विठ्ठल रुक्मिणी ऑनलाइन दर्शन पास बुकींगच्या संख्येत व वेळेत वाढ     श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणा-या भाविकांना ऑनलाईन पध्दतीने सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मंदिर समिती मार्फत संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून निशुल्क दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध असून, जास्तीत जास्त भाविकांना  श्री विठ्ठल रुक्मिणीचे सुखकर पददर्शन घेता यावे यासाठी ऑनलाइन दर्शन पास बुकींग संख्येत व वेळेत वाढ करण्यात आली असून या सुविधेचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन  व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी केले आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर च्या अधिकृत संकेतस्थळावरून दर्शन पास बुकिंगची सुविधा भाविक भक्तांसाठी उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर करून, भक्तांना त्यांच्या इच्छित दिवशी आणि वेळेस मंदिरात पदस्पर्शदर्शन घेता येते, ज्यामुळे रांगेत जास्त वेळ उभे राहण्याची आवश्यकता राहणार नाही. सण, यात्रा, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून स.7.00 ते रा.9.00 या वेळेत एकूण 6 स्लॉट निश्चित करून, प्रति स्लॉट 600 प्रमाणे दैनंदिन 3600 पा...

फुले सुपर बायोमिक्स वरदान-कुलगुरु शरद गडाख

Image
फुले सुपर बायोमिक्स शेतकर्यांसाठी वरदान - कुलगुरू डॉ. शरद गडाख महात्मा फुले कृषि विद्यापीठ उत्पादीत फुले सुपर बायोमिक्स जैविक उत्पादन शेतकर्यांसाठी वरदान ठरणार आहे. या उत्पादनामुळे शेतकर्यांना कमी खर्चामध्ये अनेक प्रकारच्या किडी व रोगांपासून त्यांच्या पिकांचे संरक्षण करता येणार आहे. याचा जास्तीत जास्त शेतकरयांनी फायदा घ्यावा असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील वनस्पती रोगशास्त्र व अणुजीवशास्त्र विभागामध्ये फुले सुपर बायोमिक्स या जैविक उत्पादनाच्या प्रयोगशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. शरद गडाख बोलत होते. याप्रसंगी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, कृषीभूषण सुरसिंग पवार, वनस्पती रोग शास्त्र व अणुजीवशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अण्णासाहेब नवले, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले व वनस्पती रोग शास्त्र व अनुजीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. संजय कोळसे ...

तनपुरे साखर कारखान्या निवडणूक साठी असे आहे चिन्ह

Image
तनपुरे सहकारी साखर कारखाना निवडणूक साठी चिन्ह मिळाले  तिन्ही पॅनल प्रचारासाठी सज्ज  जनसेवाची "कपबशी" कारखाना बचाव ची "किटली" तर शेतकरी विकासचा "गॅस"  अगदी काल परवा पर्यंत बिनविरोध वाटनारी निवडणूक तिरंगी लढतीवर होतेय  बिनविरोधच्या माध्यम चर्चेने मुळे अनेकांनी उमेदवारी अर्ज देखील भरले  प्रत्यक्षात मात्र तनपुरेंचे जनसेवा  राजु शेटे यांचे शेतकरी  अमृत धुमाळ यांची कृती समिती  निवडणूकीला सामोर्य जात आहे  तेव्हा आता कोणाच्या गॅस वर किटली तापणार तर कपबशीचा अरूणोदय होणार हे निवडणूकी नंतर स्पष्ट होईल 

तुम्हाला घरातून पाण्याचे टॅकर द्यायचे का म्हणत आमदार शिवाजी कर्डीले भडकले

Image
तुम्हाला पाण्याचे टॅकर घरातून द्याचेका म्हणत आमदार शिवाजी कर्डीले यांनी गुरुवारी राहुरी येथील शिंव चिंदबर मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व नियोजन व आढावा बैठक 2025 संपन्न झाली यावेळी  तालुक्यातील सर्व विभागाचे अधिकारी, शेतकरी , पदाधिकारी, कार्यकर्ते यांवेळी उपस्थित होते.  टंचाई व खरिप नियोजन आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले  तसेच जलजीवन व महावितरणच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत कृषी विभागाला सक्त ताकीद दिली  वाघाचा आखाडा तसेच वावरथ जाभळी येथे उद्याच टॅक्टर पाणी पुरवठा करावा तसेच ग्रामसेवकांनी  पाण्या विषयाला गाभिर्य लक्षात घेऊन हलगरजी पणा करु नये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गावाला स्वच्छ पाणी देण्याचे धोरण आहे तर कृषी लाभधारक संख्या वाढून मिळण्या कामी शासन कडे पाठपुरावा करावा लागेल  बोगस बियाने तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी या सह अनेक सुचना कर्डीले यांनी केल्या तहसीलदार नामदेव पाटील यांनी उपस्थिताचे आभार मानले