ऑनलाईन जुगार जाहीरात निषेधा साठी तेंडुलकर 252 रुपयाचे भिक

आपली पोर भिकरी करण्या साठी सचिन करत असलेल्या ऑनलाईन जुगाराची जाहीरात बंद करण्या साठी मंगळवारी श्रीरामपूरात आमदार बच्चु कडु यांच्या मार्गदर्शना खाली भिक मागो आदोलन करण्यात आले तर 252 रुपयाची भिक सचिन साठी श्रीरामपूर च्या रहिवाशांकडून दिली गेली 
भारतरत्न सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात बंद करा नाहीतर भारतरत्न परत करा अशा घोषणांनी परिसर दणाणला होता 
   
   & प्रहार जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख नामदार बच्चुभाऊ कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना वेळोवेळी सूचना निवेदने देऊन ऑनलाइन गेमिंग जुगाराची जाहिरात बंद करा असे वेळोवेळी सांगूनही तेंडुलकर यांनी कुठलीही प्रतिक्रिया न दिल्याने बच्चू कडू यांनी विधानसभा सभागृहामध्ये सचिन तेंडुलकर सारख्या भारतरत्न मिळालेल्या खेळाडूंनी ऑनलाइन गेमिंग ची जाहिरात करू नये भारतरत्न पुरस्काराचा मान राखावा म्हणून भारत सरकार व महाराष्ट्र सरकारने देखील त्यांच्यावर अंकुश ठेवन गरजेचे असल्याचे भाष्य केले होते परंतु सरकारने कुठलीही भूमिका न घेतल्याने बच्चुभाऊ कडू यांनी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुखांना भिकदान पात्रात पैसे जमा करून सचिन तेंडुलकर यांना पाठवावेत अशी भूमिका घेतल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील   भारत देशावर प्रेम करणारी नागरिक क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या विरोधात आक्रमक झाले आहेत
--अभिजीत पोटे
जिल्हाप्रमुख प्रहार जनशक्ती पक्ष अहमदनगर
 श्रीरामपूर शहरातील महात्मा गांधी स्मारकापासून महात्मा गांधी रोडवरील सर्व दुकान, दुकानदार, ग्राहक आणि गणेश मंडळांना भेटी देत भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाइन गेमिंग जुगाराची जाहिरात करणाऱ्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट मधील देव समजणाऱ्या खेळाडूंनी भारत सरकारच्या सर्वोत्कृष्ट भारतरत्न पुरस्काराचा अवमान केला असल्याने व भारत देशातील लहानांपासून अबाल वृद्धांपर्यंत सचिन तेंडुलकर यांचे करोडो चाहते असल्याने ऑनलाइन गेमिंग जुगाराची जाहिरात करून सचिन तेंडुलकर यांनी देशातील तरुणांना चुकीचा संदेश दिला असल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी भिकदान आंदोलन करत यावेळी श्रीरामपूर परिसरात वास्तव्य करणारे आंतरराष्ट्रीय खेळाडू देशाला दोन वेळा पॅरा ग्लायडिंग सारख्या साहसी खेळात सुवर्णपदक मिळवून देणारे छत्रपती पुरस्कार विजेते आप्पासाहेब ढूस यांनी भिकदान पात्रात चिल्लर टाकून खेळाडू म्हणून तेंडुलकर यांचा निषेध केला याप्रसंगी नागरिकांनी व प्रहार सैनिकांनी सचिन तेंडुलकर ऑनलाइन गेमिंग जुगार जाहिरात बंद करा नाहीतर भारतरत्न परत करा भारत माता की जय अशा घोषणा देऊन महात्मा गांधी रोडवर फेरी काढली यावेळी रस्त्यावर भिक्षा मागणाऱ्या हातावर पोट असणाऱ्या हातगाडी चालवणाऱ्या फळ विक्रेत्यांनी रस्त्यावर बसून विणकाम करणाऱ्या विणकरांनी लहान मुलांपासून अबाल वृद्धांपर्यंत भारत देशाचा स्वाभिमान जपत भिकदान पेटी मध्ये चिल्लर टाकून आपला संदेश आणि भावना सचिन तेंडुलकर यांच्यापर्यंत पोहोचवल्या आहे फक्त अर्ध्या तासात 252 नागरिकांनी एक एक रुपया भिकदान पेटी मध्ये टाकला आहे जिल्हाप्रमुख अभिजीत पोटे यांनी जमा झालेली रक्कम सचिन तेंडुलकर यांना मनी ऑर्डरने पाठवली जाईल असे सांगितले याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख पोटे यांनी प्रहार चे पक्षप्रमुख बच्चुभाऊ कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना वेळोवेळी विनंती सूचना निवेदन देऊन व विधानसभा सभागृहात देखील आवाज उठवला होता परंतु भारत सरकार किंवा महाराष्ट्र शासनाने याची कुठलीही गंभीरतेने दखल घेतली नसून व सचिन तेंडुलकर यांनी देखील ऑनलाइन गेमिंग जुगाराची जाहिरात बंद केली नसल्याने आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र राज्यातील प्रहार सैनिकांनी गणेश उत्सवात भिकदान आंदोलन सुरू केले असल्याचे सांगितले तसेच श्रीरामपूर शहरातील नागरिकांनी सचिन यांच्या ऑनलाइन गेमिंग जुगार जाहिराती बद्दल नागरिकांनी तीव्र स्वरूपात निषेध करून भिकदान आंदोलनाला प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा कार्याध्यक्ष लक्ष्मण खडके, चंद्रकांत कराळे, बाळासाहेब कराळे, श्रीरामपूर शहराध्यक्ष सोमनाथ गर्जे, प्रशांत कराळे, संदीप खडके, तुकाराम रसाळ, सुभाष तिरमली, ललित नाईकवाडे, ओंकार बेद्रे, सुमित राहिले, प्रकाश वाकड, जमशील शेख प्रहार सैनिक व श्रीरामपूर शहरातील नागरिक  सहभागी झाले होते

Comments

Popular posts from this blog

तोटा आल्याने शेअर्स बोक्रर कुटुंबासह पळुन गेला

दिवाळीत अंधार साखर कारखाना बंद

बिबट्याच्या हल्ल्यात बालिका ठार