शनिला ब्रँडेड तेलाचा भडका

शनिला ब्रँडेड तेलाचा भडका 
घडलय काय @पत्रकार शिवाजी घाडगे 
 शनिशिगणापुर येथील शनि दर्शन साठी येणार्या भाविक भक्तांना शनिवर तेल अर्पण कराचे असेल तर ते ब्रँडेड असावे असा फतवा काढला असल्याचे वृत्त आहे 
तसे मनो भावे दोन हात व मस्तक ही फार परतु आता सगळीकडे मार्केटिंग झाले यात तुम्ही कसे मागे राहणार मात्र तुमचा ब्रँडेड तेलाचा अट्टाहास कशा साठी म्हणजे यापुढे फक्त ब्रँडेड भक्तांनी यायचे ?
शनि दर्शन साठी आता राज्या सह परराज्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येने येतात मात्र त्यांना तशा सुविधां देवस्थान देत आहे का याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. 
शनि चौथर्‍यावर महिलाना प्रवेश दिल्या पासून चौथर्‍यावर प्रवेश देणे सोयीस्कर रित्या टाळले जात आहे व जो देणगी पावती दाखविल त्याला शनि चे स्पर्श दर्शन व नंतर ती देणगी पावती पुन्हा घेतली जाते याचे गौडबंगाल अद्याप ही समले नाही 
जो पर्यंत दिवंगत अध्यक्ष बाबूराव पा बानकर होते तो पर्यंत त्यांनी सर्वाना विश्वासात घेत कारभार केले त्यांच्या नंतर ही काम झाले मात्र त्यांच्या इतक्या उंचीचे नाही आता ब्रँडेड तेल अर्पण करण्याचा फतवा उद्या ब्रँडेड नाल बरच काही 
शनिशिगणापुर परिसरात गरीब मुळे अनेक कुटुंब भाजीला तेल टाकत नसतील अशा कुटुंबाना तेल देवस्थान देणार का हा प्रश्न आहे 
आम्हीच घाना  टाकून देऊ त्यांचे ब्रँडेड तेल अर्पण करा असा आदेश देवस्थान काढेल 
मात्र तेल फक्त शनि आमवसेला टाकले तर अधिकच चांगले होईल किवा जलधारा सुरू ठेवा  भक्तांच्या खिशात हात घालु नका 
मुळात  शनिशिगणापुर देवस्थान वर राजकीय मंडळीची उठ बस वाढली अण लटकुची वर्दळ देखील वाढली 
अधिका अधिक उत्तम सेवा भाविक भक्तांना द्या नुसतेच फतवे काढु नका घराला दारे नाहीत तसे विचाराचे दारे देखील उघडे ठेवा भक्तीचा बाजार माडु नका भक्त प्रेमाने भक्ती भावाने जे देतील ते घ्या नाहीतर भक्त गावातील शनिला तेल अर्पण करतील 
तसेच शनि भक्तांची ब्रँडेड लुट होणार नाही यांची काळजी घ्या म्हणजे झाले आहो साडे सातीत जेवढा त्रास होत नाही त्या पेक्षा अधिक तुम्ही देणार असेल तर भाविक कशाला येतील मुळात भाविकांना येथे आल्यावर समाधान मिळणे गरजेचे आहे मात्र तुम्ही भक्तीला तडका देत असेल तर?

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जेष्ठ नेते अरुण तनपुरे साखर कारखान्याचे चेअरमन

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर