धपाधपा छापा बनावट नोटा...
नेटक घडल काय @पत्रकार शिवाजी घाडगे
नगर जिल्हात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी चार्ज घेतल्या पासून जिल्हात अवैध व्यावसायवर टाच आणलाय फक्त यात सातत्य असायला हव .
राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी बनावट नोटा छापणारया टोळीचा पर्दाफाश करत तीन संशयित बेड्या ठोकल्या आहेत अरोपी कडुन दोन लाख बनावट नोटा सह पोलीसांना तपासात 70 लाख 73 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नगर मनमाड राज्य मार्गावरील राहुरीत गाडगे महाराज आश्रम शाळे समोर शनिवारी मध्य रात्री तीन जन बनावट नोटा घेऊन जात असल्याची टीप पोलिसांना मिळताच पोलीस अर्लट झाले अण तीन संशयित अरोपी प्रतिक भारत पवार वय 33 रा- सोलापूर, राजेंद्र कोडिबा चौगुले वय 42 रा- कर्जत अहिल्यानगर, तात्या विश्वनाथ हजारे वय 40 रा -पाटोदा कर्जत जि अहिल्यानगर असे यातील अरोपीना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत
अधिक तपासा साठी पोलीस पथक रविवारी टेर्भुनि येथे गेले असता त्यांना समाधन गुरव याच्या घर संबंधितानी भाड्याने घेतले होते तेथे झेरॉक्स मशिन व प्रिन्टर, नोटा कटिग साठी मशिन, नोटा छापायचा कागद, छापलेल्या नोटा मोजन्या साठी मशिन, कन्टोल युनिट,
तसेच पाचशेचे 75 बंडल 37 लाख 50 हजार, दोनशेचे 44 बंडल 8 लाख 80 हजार पाचशे रुपये प्रिन्ट मारलेले 18 लाख रूपये असे 70 लाख 73 हजार 920 रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला.
पोलीस निरीक्षक संजय ठेंगे याच्या या धाडसी कारवाई चे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी कौतुक करत पोलीस शाबासकी दिली खरी मात्र
हे संशयित अरोपी कोणाला या नोटा द्यायला आले होते याचा अक्का नेमका कोण आहे कारण राष्ट्रीय चलन बनावट छापून बाजारात खपवने हा गंभीर गुन्हा आहे 70 लाखा पेक्षा जास्त रक्कम आहे यातील अरोपीला या आगोदर तुरुंग वारी देखील झाली असून पूढचा तपास हे पोलीस पुढील अहवान आहे एक तर तपासात तुर्टी मुळे यातील अरोपी मोकाट सुटतात व येरे माझ्या मागल्या बनावट नोटा खपवण्या साठी यांनी नगर जिल्हाच का निवडला
भारतीय चलन बनावट छापून येथील अर्थ व्यवस्था खिळ खिळी करण्याचा पाकिस्तान डाव असुन बनावट नोटा छापण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत आपल्या कडे आता बऱ्या पैकी ऑनलाईन व्यावहार होत असले तरी येथे ही ऑनलाईन फसवणूक झाल्याचे दिसून आले आहे हजारांच्या नोटा बनावट मुळे बंद झाल्या आहेत
धपा धपा छापा नोटा छापनारी टोळी राहुरी पोलिसांच्या हाती लागली म्हणून बरे मात्र यांनी या आगोदर कोणाला सावज केले आहे हे शोधणे गरजेचे आहे
या आगोदर सप्टेंबर 1998 देखील राहुरीत एका लाॅज वर बनावट नोटा छापणारी टोळी पोलीसांनी पकडली होती व आता देखील राहुरी पोलीसांनी धडाकेबाज कारवाई केली खरच पोलिसांचे अभिनंदन
Comments
Post a Comment