सावधान मालक झोपला आहे
रिपोर्ट घाडगे न्यूज।शिवाजी घाडगे
‘मालक’ झोपल्याचा कथित व्हिडिओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या क्लिपमध्ये विमान उड्डाणात असतानाच संबंधित व्यक्ती पायलटच्या आसनावर डुलकी घेताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
हा प्रकार केवळ निष्काळजीपणाचा नसून प्रवाशांच्या सुरक्षेशी थेट खेळ असल्याची टीका होत आहे. विमान प्रवासात प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो; अशा वेळी जबाबदारीच्या जागेवर झोपणे ही गंभीर बाब मानली जात आहे.
या घटनेनंतर तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून पुढे येत आहे. नागरी उड्डाण नियमांनुसार कॉकपिटमधील शिस्त आणि सतर्कता अत्यावश्यक असते. त्यामुळे हा व्हिडिओ खरा की खोटा या चर्चेला उधाण आले आहे.
सावधान मालक झोपला आहे
विमान हवेत...
विमान हवेत असताना चक्क पायलटच्या जागेवर मालक झोपल्याचा धक्कादायक व्हिडिओ जय पवार यांच्याकडून उघड केला गेला असून आता आमदार रोहित पवार यांच्या बरोबर जय पवार यांनी देखील विमानात पायलट सीटवर झोपलेला व्हिडिओ व्हायरल करून अनेकांच्या झोपा उडवून दिल्या आहेत.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचे महिन्या भरा पुर्वी एका विमान अपघातात दुःख निधन झाले असून, या दुर्दैवी . पार्श्वभूमीवर, दादांचे यांचे चिरंजीव जय पवार यांनी या अपघाताबाबत एक अत्यंत गंभीर आणि सर्वांना हादरवून सोडणारा खुलासा सर्वांसमोर आणला आहे. ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात प्रवास करत असताना अजित पवार यांचे निधन झाले, त्याच व्हीएसआर कंपनीचे मालक हे चक्क उड्डाणादरम्यान मुख्य पायलटच्या जागेवर गाढ झोपलेले असल्याचा एक धक्कादायक व्हिडिओ जय पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांसमोर शेअर केला आहे. विमान हवेत असताना प्रवाशांच्या जीवाशी खेळणारा असा अत्यंत गंभीर स्वरूपाचा निष्काळजीपणा करणाऱ्या संबंधित विमान कंपनीवर आणि तिच्या मालकावर लवकरात लवकर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी आता जय पवार यांच्याकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात जय पवार यांनी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे अधिकृतपणे कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर आपली एक अत्यंत भावूक अशी पोस्ट शेअर केली आहे. जय पवार यांनी सर्वांसमोर जो व्हिडिओ शेअर केला आहे, त्यामध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे विमानातील मुख्य पायलटच्या आसनावर बसलेले आहेत आणि विमानाचे उड्डाण हवेत सुरू असताना ते चक्क डोळे मिटून झोपलेले आहेत.
या वेदनादायी प्रसंगी बोलताना जय पवार यांनी आपल्या मनातील तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. "माझ्या वडिलांना मी कायमचे गमावले आहे आणि ही अत्यंत तीव्र वेदना मला आयुष्यभर सहन करावी लागणार आहे," असे ते म्हणाले. पुढे त्यांनी या व्हिडिओचा संदर्भ देत म्हटले आहे की, "या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टपणे पाहू शकता की, व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे विमान हवेत उडत असताना मुख्य पायलटच्या सीटवर बसून झोपलेले आहेत. विमान जेव्हा आकाशात असते, तेव्हा अशा प्रकारचा भयंकर निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाऊ शकत नाही. हा प्रकार अत्यंत गंभीर असून तो मनाला मोठा धक्का देणारा आहे. माझी डीजीसीए कडे अत्यंत ठामपणे अशी मागणी आहे की, या गंभीर प्रकरणात तातडीने कठोर आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सुरक्षेचा उपाय म्हणून व्हीएसआर कंपनीची सर्व विमाने तात्काळ जमिनीवरच (ग्राउंड) ठेवण्यात यावीत. तसेच, संबंधितांच्या सुरक्षेशी खेळल्याप्रकरणी रोहित सिंह यांना त्वरित अटक करून त्यांच्यावर अत्यंत कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. माझ्या वडिलांसाठी आणि भविष्यात विमानाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी एका मुलाने केलेली ही अत्यंत आर्त आणि मनापासूनची हाक आहे," अशा शब्दांत जय पवार यांनी आपली स्पष्ट भूमिका पोस्टमध्ये मांडली.
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनी देखील या विमान दुर्घटनेनंतर पहिल्या दिवसापासूनच अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी या कंपनीच्या एकूणच कामकाजावर आणि कार्यपद्धतीवर सातत्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या दोषी व्यक्तींवर प्राण गमावण्यास कारणीभूत असल्याचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीपासूनच लावून धरली होती. आता जय पवार यांनी शेअर केलेल्या या ताज्या आणि धक्कादायक व्हिडिओच्या आरोपानंतर,आमदार रोहित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेला आणखी मोठे बळ प्राप्त झाले आहे.
Comments
Post a Comment