हाॅटेल पुष्पक मधुन कोणावर फुले पडणार

ब्रेकिंग | घाडगे न्यूज
हॉटेल पुष्पक मधून कोणावर फुले पडणार
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने निवडणूक लढविणार असल्याचे संकेत दिले आहेत. शनिवारी काँग्रेसचे निरीक्षक नगर दौऱ्यावर आले असून त्यांचा मुक्काम हॉटेल पुष्पक येथे आहे. येथे दोन संभाव्य नावांवर चर्चा सुरू असल्याचे समजते. मात्र, काँग्रेस खरोखरच उमेदवार जाहीर करणार का, याबाबत अद्याप अनिश्चितता कायम आहे.
दरम्यान, माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते निवडणूक लढविणार असल्याची चर्चा असली, तरी कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घेणार, हे अद्याप जाहीर झालेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे. बारामती येथेही पोटनिवडणूक अपेक्षित असल्याने शरद पवार गट दोन्ही ठिकाणी उमेदवार देईल का, याबाबत राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
शिवसेना देखील ‘मशाल’ चिन्हासह जोरदार तयारीत असून मोठी झेप घेण्याच्या प्रयत्नात आहे. भाजपाने मात्र आधीच आपला उमेदवार जाहीर केला आहे.
सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असलेली ही निवडणूक आता बहुरंगी होण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, 6 एप्रिल हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन

शहाबाज ही लोकसेवा कोण करेल यार