लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयअधिकारी कार्यालयाच्या वतीने सामूहिक ग्रंथवाचन

लेखन प्रेरणा दिनानिमित्त जिल्हा ग्रंथालयात अधिकारी कार्यालया मार्फत सामूहिक ग्रंथ वाचन 

 प्रतिभावंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य व भरीव योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांच्या जन्मदिवसा निमित्त 1 ऑगस्ट हा ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठीतील विविध ग्रंथांचे  सामूहिक वाचन करण्यात आले.
या प्रसंगी ग्रंथालय निरीक्षक रामदास  शिंदे यांच्या हस्ते  लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्प हार अर्पण करण्यात आला. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या मराठी साहित्य क्षेत्रातील अमूल्य योगदानावर मार्गदर्शन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींमधून समाजातील वास्तवाचे प्रभावी चित्रण झाले असून, त्यांच्या लेखनातून युवकांनी प्रेरणा घेऊन लेखनाकडे वळावे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी श्री.छत्रपती शिवाजी महाराज मनपा प्राथमिक  विद्यामंदिर, भूतकरवाडी सावेडी  येथील  विद्यार्थी, ग्रंथालय वाचाक सभासद  व कर्मचारी  वृंद यांनी अण्णा भाऊ साठे यांनी लिहिलेल्या विविध ग्रंथाचे  सामूहिक वाचन केले.
यावेळी   मुख्याध्यापक अरुण मारुती पवार, उपशिक्षक वर्षा गायकवाड, रजिया दफेदार, संकेत फाटक, बबन भुजबळ, तसेच ग्रंथालय वाचाक सभासद विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थिती होते.  वाचकांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यकृतींसह मराठी भाषेतील विविध विषयांवरील दर्जेदार ग्रंथ वाचनासाठी उपलब्ध करून देण्यात आले. तसेच अधिकाधिक नागरिकांनी जिल्हा ग्रंथालयाचे सभासद होऊन वाचन संस्कृतीला चालना द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी  संजय  मस्के यांनी केले. कार्यक्रमाचे  सूत्र संचालन  प्रमोद गिरी यांनी केले. आभार प्रदर्शन संतोष कापसे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

भाचा येणार नाही आता मामाच्या गावाला

जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ८४६ कोटी ९६ लाखांचा निधी मंजूर

राहुरीत अज्ञात इसमाचा खुन