Posts

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीरामपूरत

Image
मुख्यमंत्री एकनाथ शिदे श्रीरामपूरात  शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या साठी 4जानेवारी 2024 रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे येणार आहेत  त्याचबरोबर महसूल मंत्री जिल्हाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत  गेली दहा वर्षापासून सदाशिव लोखंडे शिर्डीचे खासदार म्हणून प्रतिनिधित्व करीत आहेत 

नगरचे जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ याच्या सह 18 बढती

Image
@प्रमोशन   : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्यासह राज्यातील १८ आयएएस अधिकाऱ्यांना बढती. (सिलेक्शन ग्रेड, १ जानेवारी २०२४ पासून). तूर्त आहे त्याच जागी नियुक्ती राहणार. पूर्वी नगरला असलेले भाऊसाहेब दांगडे, शिर्डीहून बदली झालेले पी. सिवा शंकर, कान्हूराज बगाटे यांचाही बढती झालेल्यांमध्ये समावेश

महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कडधान्य सुधार प्रकल्प अव्वल

Image
कडधान्य सुधार प्रकल्पांतर्गत तुर व हरभरा संशोधन केंद्रास उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन राहुरी- महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कडधान्य संशोधन प्रकल्पाअंतर्गत तूर व हरभरा योजनेला भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांच्या भारतीय कडधान्य संशोधन संस्था, कानपुर यांचे पंचवार्षिक संशोधन आढावा अहवालानुसार उत्कृष्ट संशोधन केंद्राचे मानांकन प्रदान करण्यात आले आहे. या संस्थेचा पंचवार्षिक संशोधन आढावा अहवाल नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. कडधान्य सुधार प्रकल्पाकडे आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पांतर्गत खरीप हंगामात तूर आणि रब्बी हंगामात हरभरा पीकावर संशोधनाचे कार्य चालते. कडधान्य सुधार प्रकल्पाची स्थापना सन 1973 साली झाली. सन 1982 साली आखिल भारतीय समन्वीत संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. हरभरा पिकाचे मुख्य संशोधन केंद्र म्हणून 1994 साली तर तूर पिकाचे उपकेंद्र म्हणून 2002 साली आणि मुख्य केंद्र म्हणून 2015 मध्ये भारतीय कृषि अनुसंधान परीषद, नवी दिल्ली यांची मान्यता मिळाली. कडधान्य पिकांमध्ये हरभरा, तूर, मुग, उडीद, मटकी, चवळी, कुळथी आणि राजमा या पिकांच्या एकूण 49 वाणांची शिफ...

निभेरे येथे ग्राम मेळावा

Image
निंभेरे येथे शासकीय योजना अभिसरण मेळावा संपन्न  कृषी विकास व ग्रामीण प्रशिक्षण संस्था अंतर्गत गावामध्ये जलकल जीवन कार्यक्रम सुरू आहेत जलकल जीवन कार्यक्रमांतर्गत निंभेरे गावात वृक्ष लागवड,  बायोगॅस उभारणी,शेत तलाव,शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुकूटपालन, तसेच एकूण 250 घरांना रेन वॉटर हार्वेस्टिंग ,lbs,gabian पाणलोट उपचार,सिमेंट बंधारा दूरुस्ती,फळबाग लागवड,मत्स्य व्यवसाय,शेतीशाळा,शेतकरी अभ्यास सहली,बचत गट प्रशिक्षण,भिंतीचीत्रे,शासकीय इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंग,अनेक छोटे मोठे लोककल्याणकारी उपक्रम चे काम झालेले आहेत व अजून पुढील टप्प्यात इतर घरांना  हार्वेस्टिंग करणार आहेत तसेच गांडूळ,बायोडेनामिक खत प्रात्यक्षिक,ऑरगॅनिक शेती,डेमो प्लॉट इत्यादी वैयक्तिक लाभ तसेच माती आणि पाणी संवर्धनासाठी गॅबियन,LBS , शिवडी तलाव नाला खोलीकरण,नागरे वस्ती नाला खोलीकरण इत्यादी कामे झालेली आहेत. गावामध्ये सोलर दिवे मराठी शाळेला रंगकाम इत्यादी सार्वजनिक कामे पूर्ण करण्यात आलेले आहेत तसेच बुधवारी  27 डिसेंबर 2023 रोजी जलकल जीवन कार्यक्रम आणि ग्रामपंचायत ...

दत्त जंयती साजरी

✍️राहुरी फॅक्टरी वर दत जंयती सुरेश चव्हाण यांच्या माध्यमातून साजरी  ✍️नगरसेविका सुजाता कदम व सुधाकर कदम यांनी केली आरती  ✍️श्रध्दाळु साठी महाप्रसाद  https://youtu.be/52B7iPMxIsY?si=LGEqWjknmUW-YraJ

पिंपळने येथे एसटी बस पल्टी

Image
पिपळने एसटी बस पल्टी  मंगळवारी सकाळी एस टी महामंडळाची राहुरी कडून संगमनेर कडे येणारी बस संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील पिंपळने गावामध्ये एक्सेल तुटल्यामुळे पलटी झाली आहे. सदर बसने मुख्यत्वे करून विद्यार्थी प्रवास करत होते.    काही विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संगमनेर पोलीस घटनास्थळी असून, स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी हजर आहेत. किरकोळ जखमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवलेले आहे.      "जखमीना उपचारा साठी रुग्णालयात पाठविण्यात आले पालकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पोलीस प्रशासन पुढील तपास करत आहे.    -सोमनाथ वाघचौरे,उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर

ऊसाला चाबुक काणी रोगाने घेरल

Image
उसामध्ये चाबूक काणी रोग प्रतिकारक्षम जननद्रव्यांची नोंदणी करणारे महात्मा फुले कृषि विद्यापीठ देशातील एकमेव कृषि विद्यापीठ - कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील राहुरी  महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी हे भारतातील एकमेव विद्यापीठ आहे की ज्यांनी उसावरील चाबूक काणी रोगासाठी प्रतिकारक्षम स्रोत म्हणून सन 2016 मध्ये को एम  7601, एम एस 7604 या दोन आणि सन  2023 मध्ये को एम  11086 व को एम  13083 अशा एकूण चार जननद्रव्यांची (जर्मप्लाझम) राष्ट्रीय वनस्पती अनुवंशिक संसाधन ब्युरो, नवी दिल्ली अंतर्गत असलेल्या जननद्रव्य संरक्षण विभागात नोंदणी केली आहे अशी माहिती महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी. जी. पाटील यांनी दिली.  मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे राहुरी कृषि विद्यापीठ अंतर्गत कार्यरत असून भारतातील ऊस संशोधनामध्ये काम करणार्या संस्थेपैकी एक अग्रेसर केंद्र आहे. या केंद्राने आजपर्यंत महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकर्यांसाठी अधिक उत्पादन आणि साखर उतारा देणारे 16 पेक्षा जास्त वाण, 105 पेक्षा जास्त ऊस उत्पादन वाढीसाठी अद्ययावत शिफारशी व तंत्रज्ञान दिले...